महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे ‘मराठी भय्ये’ माफी मागणार का?

 

एएमसी मिरर वेब टीम
मुंबई :
महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे ‘मराठी भय्ये’ काही न्यूज चॅनल्स आणि भाजपा नेते माफी मागणार का असा प्रश्न आता जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करुन त्यांनी भाजपावर टीका केली आहे. “सुशांत सिंह प्रकरणात काही न्यूज चॅनल्स, मराठी भय्ये आणि भाजपा नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली. आता सीबीआयनेच मान्य केलं आहे की, सुशांतने आत्महत्याच केली. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे मराठी भय्ये आता माफी मागणार का?” असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे. 


मराठी भय्ये हा आव्हाडांनी केलेला उल्लेख नेमका कुणाबाबत आहे, याबाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी आत्महत्या केली. त्यानंतर त्याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे. सुशांत हा बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा बळी आहे. बॉलिवूडमधल्या कंपूशाहीने त्याचा बळी घेतला आहे अशी टीका झाली. यासंदर्भातले वृत्तही काही वाहिन्यांवर झळकले. त्यानंतर तडकाफडकी हा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्यात आला. दरम्यान एम्स रुग्णालयाने सुशांतचा मृ्त्यू ही आत्महत्याच आहे असा अहवाल दिला. ज्यानंतर आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून भाजपावर टीका होते आहे.

Post a Comment

Previous Post Next Post