मूतखड्याचा त्रास टाळण्यासाठी ‘हे’ पदार्थ आहेत रामबाण इलाजएएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

शरीरातील विषारी घटकद्रव्ये बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम किडनी करत असते. रक्त शुद्ध करून विषारी द्रव्ये शरीराबाहेर टाकणाऱ्या किडनीच्या आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे असते. किडनीच्या कामात अडथळे निर्माण झाल्यास पोटदुखी, ताप, अस्वस्थता, मळमळ आणि उलटी होणे यासारखे त्रास जाणवतात. किडनीच्या कामात बाधा निर्माण झाल्यास विषारी घटकद्रव्ये शरीराबाहेर टाकली जात नाहीत. त्यामुळे किडनीत विषारी पदार्थ साचल्याने गंभीर आजार होण्याचा धोका असतो. मूतखड्यामुळेही किडनीच्या कामात अडथळे येतात. किडनीचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि किडनीच्या स्वच्छतेसाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करणे गरजेचे असते.

जेवणात खाद्यपदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी कोथिंबीरीचा वापर करतात. कोथिंबीरीत शरीरातील विषारी घटकद्रव्ये बाहेर टाकण्याचे औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे किडनीच्या आरोग्यासाठी कोथिंबीरी फायद्याची आहे. तसेच कोथिंबीरीमुळे किडनीचीही स्वच्छता होते. नेहमी फोडणीसाठी वापरण्यात येणारे जिरे किडनीसाठीही उपयोगी असतात. जिरे, धणे आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण किडणीसाठी फायदेशीर ठरते. एक लिटर पाणी मंद आचेवर उकळत ठेवावे. त्यात धणे किंवा कोथिंबीरीची काही पाने टाकावीत. 10 मिनिटे पाणी उकळावे. उकळलेल्या पाण्यात लिंबाच्या लहान फोडी टाकून चमचाभर जिरे टाकवे. हे मिश्रण पाच मिनिटे उकळावे. त्यानंतर गाळून हे मिश्रण घ्यावे. हे मिश्रण रोज घेतल्याने किडनीची स्वच्छता होते आणि पोटाचे विकारही दूर होतात. किडनीची स्वच्छता होत असल्याने मूतखड्याचा त्रासही होत नाही.

मक्याच्या कणसात असणारे सोनेरी रंगाचे धागे किडनीच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे असतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. उकळलेल्या पाण्यात मक्याच्या कणसाचे सोनेरी धागे टाकावे आणि मंद आचोवर उकळावे. त्या पाण्यात लिंबूचे तुकडे टाकावेत. त्यानंतर गाळून हे मिश्रण घ्यावे. हे मिश्रण दररोज घेतल्याने मूतखड्याचा त्रास दूर होतो. शरीरातील विषारी घटकद्रव्ये बाहेर पडून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाही मदत होते. किडनीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करावा किंवा ही पेय घ्यावीत. मात्र, त्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

(ही बातमी जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी 'एएमसी मिरर'चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post