पवारांसाठी त्यावेळी विखेंनी शब्द टाकला होता.. 'देह वेचावा कारणी' पुस्तकात उल्लेखएएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
राज्य व देशाच्या राजकारणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार व नगरचे ज्येष्ठ नेते स्व. बाळासाहेब विखे यांचे फारसे सख्य नसल्याचे सांगितले जात असले, तरी कधीकाळी विखे यांनी पवारांसाठी काँग्रेस 'हायकमांड'कडे शब्द टाकला होता, अशी माहिती स्व. विखे यांच्या 'देह वेचावा कारणी' या पुस्तकात आहे. थोड्याच वेळात या पुस्तकाचे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.

नगरसह जिल्हा, राज्य व देशाच्या राजकारणात कर्तृत्वाचा ठसा उमटावणारे लोकनेते स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी 'देह वेचावा कारणी' आत्मचरित्र लिहिले आहे. संगमनेरचे इतिहास अभ्यासक व राजकीय विश्लेषक संतोष खेडलेकर यांनी या पुस्तकाचे थोडक्यात विश्लेषण केले असून, त्यातून राज्य व देशातील अनेक धक्कादायक घडामोडीवर प्रकाश पडणार आहे. खेडलेकर यांनी 'एएमसी मिरर'शी बोलताना पुस्तकातील महत्वाचे मुद्दे हायलाईट केले आहेत. 

काय आहे बाळासाहेब विखे यांच्या आत्मचरित्रात..

राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या आत्मचरित्राबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. राजकीय व्यक्तीचे आत्मचरित्र म्हटले की, त्यात त्यांनी कुणावर शरसंधान केले असेल, त्यांनी कुणाबाबत चांगले लिहिले असेल व कोणाबद्दल वाईट लिहिले असेल, याची उत्सुकता असते. या पुस्तकात जिल्ह्यातील नेत्यांपासून ते राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांबद्दल लिहिलेलं आहे. नगर जिल्ह्यातील कोपरगावच्या काळे-कोल्हे यांच्या सहमतीच्या राजकारणाचे पदर विखेंनी खास आपल्या शैलीत उलगडले आहेत. अण्णासाहेब शिंदे आणि पी. बी. कडू पाटील यांच्याबद्दल काहीसे परखड भाष्य या पुस्तकात वाचायला मिळते.

विखेंच्या राजकीय जीवनाची सुरुवात, खासदारकीची संधी, राजकारणातील चढउतार याबाबत पानोपानी भाष्य आहेच. पण वाचकांना उत्सुकता असलेल्या त्यांच्या शिवसेना प्रवेशाविषयी त्यांनी सविस्तर लिहिले आहे. शिवसेना का सोडावी लागली, शिवसेनेतील कोणत्या बड्या नेत्याला विखेंचा करिष्मा डोईजड वाटू लागला, याबाबतही त्यांनी परखड भाष्य केले आहे.

शरद पवार आणि विखे यांचे राजकीय संबंध याबाबत पुस्तकात वेळोवेळी भाष्य केलेले आहे. राजीव गांधींकडे शब्द टाकून शरद पवार यांना काँग्रेसमध्ये परत आणण्यात विखे यांचाही वाटा असल्याची माहिती पुस्तकात मिळते. गडाख आणि विखे निवडणूक खटला हे प्रकरणही वाचनीय झालेले आहे.

पुस्तकातला आणखी खळबळजनक भाग म्हणजे बाळासाहेब विखे यांना जीवे मारण्याचे काही प्रयत्न झाले, कुणी केले हे सर्व? यासाठीही पुस्तक वाचले पाहिजे..

2 Comments

Post a Comment

Previous Post Next Post