शिखर बँक प्रकरण : नगर जिल्ह्याशी संबंधित पाच नेत्यांच्या समर्थकांना मिळाला दिलासा

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
शिखर बँक प्रकरणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांसह राज्यभरातील बड्या नेत्यांना पोलिसांनी क्लिन चीट दिल्याने नगर जिल्ह्याशी संबंधित पाच नेत्यांना व त्यांच्या समर्थकांनाही दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कर्ज वाटपात मनमानी केली होती. या घोटाळाप्रकरणी अजित पवार यांच्यासह एकूण 70 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार व खासदार यशवंतराव गडाख आणि प्रसाद तनपुरे तसेच माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते गुलाबराव शेळके तसेच नगर जिल्ह्याचे नवे पालकमंत्री व कोल्हापूरचे नेते हसन मुश्रिफ यांचीही नावे होती. पण पोलिसांनी सर्वांना क्लीन चिट दिल्याने नगर जिल्ह्याशी संबंधित पाचही नेत्यांना व त्यांच्या समर्थकांना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारे 2005 ते 2010 काळात मोठ्या प्रमाणावर कर्जांचे वाटप करण्यात आले होते. या कर्जवाटपामुळे राज्य सहकारी बँकेला 10 हजार कोटींचे नुकसान झाले होते. तर हा घोटाळा एकूण 25 हजार कोटींवर गेल्याचा आरोप होता. या प्रकरणी ज्येष्ठ समाजसमवेक अण्णा हजारे यांनी चार वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती.

या प्रकरणातून क्लीन चिट मिळालेल्या राज्यभरातील बड्या नावे - 

माणिकराव पाटील, निलेश बाळासाहेब नाईक, विजयसिंह मोहिते पाटील, अजित पवार, दिलीपराव देशमुख, राजेंद्र शिंगणे, मदन पाटील, हसन मुश्रीफ, मधुकरराव चव्हाण, शिवराम जाधव, गुलाबराव शेळके, सिद्धराम्मपा अल्लुरे, विलासराव पाटील, रवींद्र दुर्गावकर, अरविंद पोरेदिवार, सदाशिवराव मंडलिक, यशवंतराव गडाख, लीलावती जाधव, मधुकरराव जुंजाळ, प्रसाद तनपुरे, आनंदराव चव्हाण, सरकार रावल, बाबासाहेब वासदे, नरेशचंद्र ठाकरे, नितीन पाटील, किरण देशमुख, तानाजीराव चोरगे, दत्तात्रय पाटील, राजेंद्र जैन, तुकाराम ढिगोळे, मीनाक्षी पाटील, रवींद्र शेट्ये, पृथ्वीराज देशमुख, आनंदराव अडसूळ, राजेंद्र पाटील, अंकुश पोळ, नंदकुमार धोटे, जगन्नाथ पाटील, सुरेश देशमुख, उषाताई चौधरी, संतोषकुमार कोरपे, जयंत पाटील, देवीदास पिंगळे, एन. डी. कांबळे, राजवर्धन कदमबांडे, गंगाधरराव देशमुख, रामप्रसाद कदम, धनंजय दलाल, जयंतराव आवळे, वसंतराव शिंदे, डी. एम. माहोळ, पांडुरंग फुंडकर, ईश्वरलाल जैन, वसंतराव पवार, राजन तेली, दिलीपराव सोपल, चंद्रशेखर घुले पाटील, विलासराव जगताप, अमरसिंह पंडित, योगेश पाटील, शेखर निकम, श्रीनिवास देशमुख, डी. एम. रवींद्र देशमुख, विश्वासराव शिंदे, यशवंत पाटील, बबनराव तायवाडे, अविनाश अरिंगले, रजनीताई पाटील, लक्ष्मणराव पाटील, माणिकराव कोकाटे, राहुल मोरे, शिवाजीराव नलावडे, सुनील फुंडे, शैलजा मोरे आणि व्यवस्थापकीय संचालक.

Post a Comment

Previous Post Next Post