पुण्यातील 'सिरम'मध्ये 'कोविशिल्ड' लस कशी तयार होते?

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

'सिरम' मध्ये ब्रिटनच्या 'ऑक्सफर्ड विद्यापीठा'तील संशोधकांनी जी लस निर्माण केली तिची निर्मिती होते आहे. या लशीचं 'कोविशिल्ड' नाव आहे. आजमितीला जगात सर्वाधिक लशींचं उत्पादन 'सिरम'च्या या परिसरात होतं. सिरम'च्या पहिल्यापासून असलेल्या परिसरातल्या काही इमारती आता 'कोविशिल्ड'च्या उत्पादनासाठी राखीव झाल्या आहेत.

लस कधी येणार?
सध्या लशीच्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा भारतासह जगभरात सुरु आहे. थोड्याच काळात तिसरा टप्पा सुरु होणार आहे. त्याचे निष्कर्ष आल्यावर मग शेवटच्या परवानगीसहीत ही लस डिसेंबरपर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे.

'सिरम इन्स्टिट्यूट'चे सीईओ अदर पूनावाला म्हणाले, पुढच्या 2-3 महिन्यांत लशीचे उत्पादन तिपटीने वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे या वर्षाच्या अखेरीस 250 दशलक्ष लशीचे डोस तयार असतील."

'कोविशिल्ड' लस दोन भागांमध्ये

  • पहिला डोस घेतल्यावर, 28 दिवसांनी दुसरा 'बूस्टर डोस' घ्यावा लागेल. म्हणजे तेवढेच डोसेसची संख्याही वाढते. म्हणजे जेव्हा पूर्ण क्षमतेनं उत्पादन सुरू होईल तेव्हा डोसेसची संख्या अब्जावधींमध्ये असेल. तशी 'सिरम'ची क्षमता आहे.
  • म्हणजे जेव्हा 'सिरम'मध्ये एका प्रॉडक्शन लाईनवर लस 'व्हायल'मध्ये म्हणजे बाटल्यांमध्ये भरली जाते, तेव्हा इथं मिनिटाला 500 व्हायल्स भरल्या जातात.
  • एका व्हायलमध्ये 10 डोसेस असतात. म्हणजे मिनिटाला 5000 डोसेस होतात. अशा अनेक प्रॉडक्शन लाईनवर उत्पादन जेव्हा सुरू होईल तेव्हा दिवसाची कोट्यावधी डोसेस निर्मितीची क्षमता असेल. त्यामुळे 2 भागांमध्ये दिल्या जाणाऱ्या या लशीच्या अब्जावधी डोसेसची गरज काही महिन्यांमध्ये पुरवता येईल.


तिसऱ्या टप्प्यातल्या मानवी चाचण्या

▪️ दुसरीकडे 'कोविशिल्ड'ची मानवी चाचणी भारतातही सुरू झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात 100 जणांना ही लस देण्यात आली आहे

▪️ येत्या पंधरवड्यात सुरू होणाऱ्या या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांसाठी जगभरातल्या हजारो स्वयंसेवकांना लस देण्यात येईल. भारतात 1600 जण या टप्प्यात असतील.

('कोरा' या संकेतस्थळावर आकाश कोल्हे यांनी ही माहिती दिली आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post