कोरोनानंतर केस गळती झाल्यास कशी रोखणार?


एएमसी मिरर वेब टीम 
ऑनलाईन न्यूज 
बॉलीवुडमधील सेलिब्रिटी आणि आपल्या फिटनेससाठी ओळखली जाणारी मलाइका अरोराने काही दिवसांपूर्वी कोरोनावर मात केली आहे. हा काळ अत्यंत कठीण होता. आता पूर्ण बरे झाल्यानंतर पुन्हा एकदा ‘इंडियाज बेस्ट डांसर’च्या मंचावर ती पोहोचली आहे. मलाइका अरोरा नेहमीच फिटनेस मंत्र आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आली आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर देखील तिने अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडिया हँडलवरून शेअर केली आहे.

मलाइकाला कोरोनाच्या काळात त्रास झाला मात्र टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर देखील तिला त्याचे परिणाम शरीरावर झाल्याचे स्पष्ट जाणवले. अशक्तपणा वाढला होता आणि त्यासोबत केस गळण्याचे प्रमाणही अधिक होते. हे लक्षात घेऊन मलाइकाने या केस गळतीवर काय उपाय करायचा ते एका व्हिडीओद्वारे सांगितले आहे.

मलाइकाने व्हिडीओमध्ये #malaikastrickortip हा हॅशटॅग वापरून टिप्स शेअर केल्या आहेत. हे उपाय अगदी सहज सोपे आहेत. मलाइकाने सांगितले की, कांद्याचा रस काढून तो केसांना लावल्यास केस गळती रोखण्यास मदत होते. मलाइकाने स्वत: हा उपाय करून पाहिला आहे आणि व्हिडीओत देखील ती कांद्याचा रस केसांना लावत असल्याचे दिसते आहे. ती एक कांदा घेते त्याचा रस काढते. त्यानंतर कापसाच्या बोळ्याने तो रस केसांवर हळूवारपणे लावते.

मलाइकाने सांगते की, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ती सध्या विटामिन्सचे सप्लिमेंट्स आणि औषधं घेत आहे. मात्र हा घरगुती आयुर्वेदिक उपाय आहे जो अनेक वर्षांपासून ती फॉलो करत आहे. काही काळापर्यंत सातत्याने हा उपाय केल्यास फायदा होतो असा तिचा विश्वास आहे. मलाइका कोरोना पॉजिटिव्ह झाली होती. त्यानंतर तिने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार घेतले. आता ती पूर्ण बरी झाली असून सेटवर जाण्यास सुरुवात केली आहे. सेटवर मलाइकाचे दणक्यात स्वागत करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post