एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
ऑनलाईन न्यूज
राष्ट्रवादीमध्ये एकनाथ खडसे यांचा प्रवेश ही तर
झाकी आहे, बाकी सब आना बाकी है, असे वक्तव्य मंत्री हसन
मुश्रीफ यांनी केले. खडसे राष्ट्रवादीत आल्यावर त्यांचा सन्मानच होणार आहे
अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली. राष्ट्रवादीत जे येणार आहेत ,
त्यांचे मेरिट तपासले जाईल, त्यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी योग्यवेळी निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.
अहमदनगर जिल्हाधिकारी
कार्यालयात आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी आमदार आशुतोष काळे,
नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा
परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
जगन्नाथ भोर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्तात्रय राठोड, महानगरपालिकेचे
आयुक्त श्रीकांत मायकलवार आदी उपस्थित होते.
मुश्रीफ
म्हणाले म्हणाले की, भाजपच्या जडणघडणीमध्ये एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा होता.
चाळीस वर्षापासून ते पक्षाचे काम करत होते. गेल्या पंचवीस वर्ष मी सभागृहांमध्ये आहे.
आमच्यासमोर देवेंद्र फडणवीस हे खडसे यांच्या मागे
फिरायचे. मात्र आज काय अवस्था आहे? तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी इतर
माध्यमांद्वारे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, हे किती दुर्दैव आहे. खडसेंवर
त्यांनी अन्याय केला, खोटा गुन्हा दाखल करून त्यांना अपमानास्पद
वागणूक दिली, हे खडसे यांनी बोलून दाखवले आहे.
खडसे यांच्या सारखा नेता एवढा कसा अन्याय सहन
करू शकतो, याचं मला आश्चर्य वाटलं, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीने खडसे यांच्याबाबत पूर्वी काही
विधाने केलेली होती. ती विधाने मागे घेण्यात आलेली आहेत. खडसेंचे कर्तृत्व दुर्लक्षित करून चालणार नाही. उलट ते राष्ट्रवादीत आल्याने खानदेशामध्ये
मोठे बळ मिळेल, असे ते म्हणाले
राष्ट्रवादी
काँग्रेसमध्ये जे नवे-जुने येणार असतील त्यांच्या संदर्भात पक्ष पातळीवर
निर्णय घेतले जातील. पण जुन्यांना घ्यायचे की नाही, असे विचारल्यावर त्यांचे
मेरीट तपासूनच त्यांना पक्षांमध्ये घेतले जाईल, असे
मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
Post a Comment