'या' कंपन्यांचे मोबाइल फोन महागणार?

संग्रहीत छायाचित्र

एएमसी मिरर वेब टीम
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून मोबाइल फोनसाठी वापरात येणाऱ्या प्रदर्शन काचपट्टीच्या अर्थात ‘डिस्प्ले’चे आयातशुल्क ३ टक्क्यांनी वाढवून ते १० टक्क्यांवर नेण्याचा विचार सुरू असून, त्यामुळे फोनच्या किमती वाढतील, असे ‘इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (आयसीईए)’ या संघटनेने शुक्रवारी स्पष्ट केले.

आयसीईएचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज महिंद्रू यांच्या मते, मोबाइल फोनच्या किमती किमान दीड ते कमाल तीन टक्क्यांनी वाढू शकतील. अ‍ॅपल, हुआवे, शाओमी, विवो आणि विन्स्ट्रॉन या नाममुद्रांचे फोन महागण्याची शक्यता दिसून येते.

Post a Comment

Previous Post Next Post