या स्मार्टफोनवर ४० हजार रुपयांची सूट, पाहा काय आहे ऑफर

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

Flipkart Big Billion Day 2020 : Motorola कंपनीने आपल्या स्मार्टफोन्ससाठी डिल्स आणि डिस्काउंट्सची घोषणा केली आहे. ग्राहाकंना याचा फायदा Flipkart च्या बहुप्रतिक्षीत ‘बिग बिलियन डेज सेल’मध्ये होणार आहे. १६ ऑक्टोबरपासून या सेलला सुरुवात होणार आहे. यामध्ये Moto G9, Motorola One Fusion+ आणि Moto E7 Plus सारख्या स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.

Flipkart च्या ‘बिग बिलियन डेज सेल’मध्ये Motorola Razr (2019) वरही मोठी सूट देण्यात आली असून याची किंमत ८४ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. यासह फ्लॅगशिप Motorola Edge+ ला फ्लिपकार्टवर ६४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करु शकता. या दोन्ही स्मार्टफोन्सवर नो-कॉस्ट EMI पर्याय देण्यात आला आहे.

ऑफर्सबद्दल बोलायचं झाल्यास Motorola Razr (2019) या स्मार्टफोनला एक लाख २४ हजार ९९९ रुपये किंमतीत लाँच करण्यात आलं होतं. सेलमध्ये हा स्मार्टफोन ८४ हजार ९९९ रुपयांत विकत घेता येणार आहे. गेल्या महिन्यात कंपनीने या स्मार्टफोनच्या किंमतीत ३० हजार रुपयांनी कपात करुन ९४ हजार ९९९ रुपये केली होती. पण हे फक्त ऑफलाइन रिटेल्ससाठी होतं. सध्या फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन्स एक लाख २४ हजार ९९९ रुपयांमध्ये लिस्टेड आहे. बिग बिलियन डेज सेलमध्ये या फोनवर ४० हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे.

Motorola Edge+ वर फ्लिपकार्ट सेलमध्ये दहा हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. Moto G9 या स्मार्टफोन्सवर या सेलमध्ये एक हाजर ५०० रुपयांची सूट देण्यात आली आहे. सेलमध्ये हा फोन तुम्ही ९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करु शकत. यासोबतच सेलमध्ये तुम्ही एसबीआय कार्ड्सने खरेदी करणाऱ्यांना दहा टक्केंचा डिस्काउंट देण्यात आला आहे.Post a Comment

Previous Post Next Post