नवरात्री : जाणून घ्या, यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

गणेशोत्सवानंतर काही दिवसांतच येऊन ठेपणाऱ्या नवरात्रोत्सवाची अनेक मंडळी आतुरतेने वाट बघतात. दसरा, नवरात्री हे सण तरुणाईसाठी खास असतात. यंदा शनिवारपासून नवरात्रौत्सवाला सुरूवात होतं आहे. १७ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या काळात नऊ दिवस ठिकठिकाणी आदिशक्तीचा जागर असतो. गेल्या दशकभरापासून नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा सुरू आहे. एकाच रंगांची वस्त्रे परिधान केल्याने सगळ्या महिलांमध्ये एकता दिसते अशी या मागील धारणा आहे. एकोपा आणि समानतेचा संदेश यातून दिला जातो.

नवरात्रीचे नऊ रंग (२०२०)
१७ ऑक्टोबर – प्रतिपदा – राखाडी (Grey)
१८ ऑक्टोबर – द्वितिया – केशरी/नारंगी (Orange)
१९ ऑक्टोबर – तृतिया – पांढरा (White)
२० ऑक्टोबर – चतुर्थी – लाल (Red)
२१ ऑक्टोबर – पंचमी – निळा (Royal Blue)
२२ ऑक्टोबर – षष्ठी – पिवळा (Yellow )
२३ ऑक्टोबर सप्तमी- हिरवा (Green)
२४ ऑक्टोबर – अष्टमी – मोरपंखी (Peacock Green)
२५ ऑक्टोबर – नवमी – जांभळा (Purple)

खरंतर धर्मशास्त्रात रंगांची प्रथा नाही. नवरात्रीत नऊ रंगांची वस्त्रे परिधान करण्याची संकल्पना साधरण दहा पंधरा वर्षांपासून सुरू झाली. नवरात्र हा निर्मितीचा उत्सव आहे. नऊ दिवसांत या रंगांमुळे साऱ्याजणी एकमेकींच्या जवळ येतात. त्यांच्यामध्ये समानता दिसते. या दिवसात गरीब-श्रीमंत अशी दरी दिसत नाही. एकाच रंगांची वस्त्रे परिधान केल्याने सगळ्या महिलांमध्ये एकता दिसते. हे रंग एकमेकींना बांधून ठेवतात. म्हणून एकोपा, समानता यावी यासाठी नऊ दिवस नऊ रंगाची वस्त्रे परिधान करण्याच्या प्रथेला सुरुवात झाली, असे सांगितले जाते.

Post a Comment

Previous Post Next Post