Oppo चा सहा कॅमेऱ्यांचा स्मार्टफोन झाला स्वस्तएएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज 
ओप्पो कंपनीचा शानदार स्मार्टफोन Oppo Reno 3 Pro आता स्वस्त झाला आहे. 8जीबी रॅम आणि १२८ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेजसोबत येणाऱ्या या फोनच्या किंमतीत तब्बल दोन हजार रुपयांपर्यंत कपात झाली आहे. या फोनमध्ये मागील बाजूला 64 MP च्या मुख्य कॅमेऱ्यासह क्वॉड-रिअर कॅमेरा अर्थात चार कॅमेऱ्यांचा सेटअप आणि सेल्फीसाठी ड्युअल सेल्फी कॅमेरा सेटअप, असे एकूण सहा कॅमेरे आहेत.

किंमत
कंपनीने Reno 3 Pro च्या 8जीबी रॅम +128जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत दोन हजार रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे आता हा फोन 25 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या नवीन किंमतीला अॅमेझॉनवर लिस्ट केले आहे. परंतु, कंपनीने अद्याप याची अधिकृतपणे घोषणा केली नाही.ऑगस्टमध्ये ओप्पो रेनो ३ प्रोचा ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटला अनुक्रमे २ हजार आणि ३ हजार रुपयांची कपात केली होती.

फीचर्स 
ओप्पो रेनो 3 प्रो ऑरोरा ब्लू, मिडनाईट ब्लॅक आणि स्काय व्हाईट अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी+ Super AMOLED डिस्प्ले आहे. मीडियाटेक हीलियो P95 SoC प्रोसेसर या फोनमध्ये असून अँड्ऱॉइड 10 वर आधारित कलर OS-7 वर हा फोन कार्यरत आहे. ओप्पो रेनो 3 प्रो मध्ये चार रिअर कॅमेरे आहेत. यात 13 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स, 64 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आहे. 2 मेगापिक्सलचा मोनो लेन्स, तर 8 मेगापिक्सलचा वाइड एंगल कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच ओप्पो रेनो 3 प्रो मध्ये मीडियाटेक हेलियो पी 95 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनसह, आपल्याला 4025mAh बॅटरी देण्यात आली असून 30W VOOC वेगवान चार्जिंग सपोर्टदेखील देण्यात आला आहे. ओप्पो रेनो 3 प्रो मध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. यात यूएसबी टाइप सी कनेक्टर आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये तब्बल 44 मेगापिक्सलचा ड्युअल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यातील दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा आहे. यासह, अल्ट्रा नाईट सेल्फी मोड, एआय नॉइस कॅन्सलेशन अशी वैशिष्ट्ये देखील आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post