मोदी-मोदी! घोषणांनी दणाणली पाकिस्तानची संसद

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

पाकिस्तानच्या संसदेत नेमकं चाललंय काय? असाच प्रश्न आज झालेल्या प्रकारामुळे समस्त जगाला पडला असेल. कारण आज पाकिस्तानच्या संसदेत चक्क मोदी-मोदी आणि आझादीच्या घोषणा ऐकायला मिळाल्या. बलुचिस्तानच्या खासदारांनी पाकिस्तानच्या संसदेत मोदी-मोदी आणि आझादीच्या घोषणा दिल्या. ज्यामुळे परराष्ट्र मंत्र्यांचा चेहरा रागाने लालबुंद झालेला पाहण्यास मिळाला. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री हे फ्रेंच उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासंबंधीची त्यांची भूमिका मांडत होते. त्यावेळी बलुचिस्तानच्या खासदारांनी मोदी-मोदी आणि आझादी या घोषणा दिल्या. इम्रान खान सरकारवर असलेला राग यातून दिसून आला. तसंच इम्रान खान सरकार करोनाची परिस्थिती हाताळण्यातही अपयशी ठरलंय असंही या खासदारांचं म्हणणं आहे.

पाहा व्हिडीओ


पाकिस्तानमध्ये आलेल्या करोना संकटाचा मुकाबला इम्रान खान सरकारला योग्य रितीने करता आला नाही असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान आज पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमुद कुरेशी हे बोलण्यासाठी उभे राहिले, फ्रान्सच्या उत्पादनांवर पाकिस्तानने बहिष्कार घातला पाहिजे असं ते सांगत होते त्याचवेळी बलुचिस्तानच्या खासदारांनी मोदी-मोदी आणि आझादी या घोषणा देण्यास सुरुवात केली. यामुळे कुरेशी यांचा राग अनावर झाला होता. त्यांचा चेहरा ते स्पष्ट सांगत होता. एवढंच नाही विरोधी पक्षांकडूनही त्यांच्या भाषणात वारंवार घोषणाबाजीने व्यत्यय आणला गेला.

Post a Comment

Previous Post Next Post