ग्रहांच्या शोध मोहिमा खासगी व्यक्ती वा संस्थांनाही करता येणार



एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर :
स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच भविष्यकालीन ग्रहांच्या शोधमोहीमा व अंतराळाबाहेरील मार्गक्रमण इत्यादी खासगी क्षेत्रासाठी खुल्या होणार आहेत व भारताच्या अंतराळ क्षेत्रातील यात्रेत भारतातील खासगी क्षेत्र सहप्रवासी होणार आहे.

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी यासंदर्भात सांगितले की, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने हे क्षेत्र आता खासगी क्षेत्राला खुले करण्याची सर्व तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील अंतराळ विभागातील काही पथदर्शी ऐतिहासिक सुधारणांचा उल्लेख करीत डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले, मोदी सरकारच्या आत्मनिर्भर भारताच्या पथदर्शी आराखड्यातील आत्मनिर्भरतेचा हा एक भाग असून त्यायोगे अंतरीक्ष क्षेत्रात खासगी क्षेत्राला पुढाकार देऊन चालना देत सहभागी करण्यात येणार आहे. ते पुढे म्हणाले, भारतीय खासगी क्षेत्र हे भारताच्या अंतराळ क्षेत्रातील सहप्रवासी असेल. खासगी कंपन्यांना उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी आणि अंतराळ क्षेत्रातील उपक्रमांसाठी समान पातळीवर संधी उपलब्ध होईल. यामुळे देशातील अंतराळ क्षेत्रातील उपक्रम, पुरवठा आधारित पध्दतीवरून मागणी आधारीत पध्दतीत परिवर्तित होईल. भारतीय राष्ट्रीय अंतरीक्ष विकास आणि अधिकार केंद्र स्थापन करून (इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन ॲण्ड ऑथरायझेशन सेंटर) कार्यप्रणाली सुलभ करीत खासगी क्षेत्राला इस्रोच्या सोयीसुविधा आणि इतर उपयुक्त मालमत्ता त्यांच्या क्षमता सुधारण्यासाठी वापरता येतील. खासगी कंपन्यांना त्यांचे अर्ज पाठविण्यासाठी तयार केलेल्या वेबलिंकची माहितीही डॉ. जितेंद्र सिंग यांनी दिली. कंपन्यांकडून आणि स्टार्ट अप्सकडून आलेल्या या माहितीचे उच्चस्तरीय समितीद्वारे विश्लेषण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post