आत्मनिर्भर भारत घडवण्याचे काम बाळासाहेब विखे यांनी आयुष्यभर केले : पंतप्रधान मोदी


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
गाव, गोरगरीब व शेतकरी तसेच शिक्षण व सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण रोजगाराला आयुष्यभर महत्व देऊन, त्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत घडवण्याचे काम बाळासाहेब विखे यांनी आयुष्यभर केले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदमभूषण स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्याचा गौरव केला.

स्व. बाळासाहेब विखे लिखित 'देह वेचावा कारणी' पुस्तकाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून ऑनलाईन कार्यक्रमात दिमाखात प्रकाशन झाले.  प्रवरा नगर येथील कार्यक्रमास केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते. गाव आणि गरिबांच्या विकासासाठी विखे पाटलांचे योगदान आहे. पुढील पिढीला त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळेल. हे पुस्तक युवकांसाठी व आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. गाव, गरिब व शेतकऱ्यांचे दुख: त्यांनी स्वत: पाहिले. त्यामुळे शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांनी सहकारातून विकास केला, असे मोदी म्हणाले.

कार्यक्रमाचे हायलाईट्स..

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका..
  • पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाचे श्रेय दिले बाळासाहेब विखे यांना..
  • बाळासाहेब विखे मूळ काँग्रेस पक्षाचे होते. तेथे कोंडला गेलेला हा हिरा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मंत्रिपदाच्या कोंदणात बसवला : मुख्यमंत्री ठाकरे
  • माझ्या मराठी माणसाचा, कष्टकरी शेतकऱ्याचा उपयोग देशाच्या विकासासाठी व्हावा, असा उद्देश त्यावेळी त्यांना मंत्रिपद देण्यामागे होता : मुखमंत्री ठाकरे
  • कार्यक्रमास भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. काँग्रेस नेत्यांनी फिरवली पाठ..
  • काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण मराठा आरक्षण बैठकीत व्यस्त होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना मी स्वतः आमंत्रण दिले होते. राजकारणाच्या मर्यादा किती पाळायच्या व राजकारणापलीकडे किती पहायचे, हा प्रत्येकाचा विषय असतो. पण पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी बाळासाहेब विखेंचा गौरव केला. आता अन्य कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, आशा शब्दात विखेंनी थोरातांना टोला लगावला.

Post a Comment

Previous Post Next Post