20 नोव्हेंबरपासून दहावी, बारावीची फेरपरीक्षा, वेळापत्रक जाहीरएएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या फेरपरीक्षांचे वेळापत्रक अखेर मंगळवारी जारी केले. 20 नोव्हेंबरपासून लेखी तर 18 नोव्हेंबरपासून तोंडी, प्रात्यक्षिक व श्रेणीविषयाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. दहावीची परीक्षा 5 डिसेंबरपर्यंत तर बारावीच्या सर्वसाधारण व द्विलक्षी अभ्यासक्रमाची परीक्षा 10 डिसेंबरपर्यंत घेण्यात येणार आहे. तसेच बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा 7 डिसेंबरपर्यंत, दहावीच्या परीक्षा या 5 डिसेंबरपर्यंत तर बारावीच्या परीक्षा 10 डिसेंबरपर्यंत घेण्यात येणार आहेत. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक www.mahahsscboard.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

छापील वेळापत्रकच अंतिम
शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेले हे तात्पुरत्या स्वरूपात विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी असून शाळा, कॉलेजमधून मिळणाऱ्या छापील वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी केले आहे. तसेच इतर कोणत्याही माध्यमातून मिळालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये असेही त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post