बिग बॉसच्या घरात 'ही' अडल्ट स्टार करणार प्रवेश?

 

एएमसी मिरर वेब टीम
मुंबई :
बिग बॉसचा 14 वा सिझन सुरू झाला आहे. अकरा सदस्य व तीन सिनियर्स सिद्धार्थ शुक्ला, हिना खान व गौहर खानने घरात प्रवेश केला आहे. सिझनच्या पहिल्याच दिवशी घरात वादावादी सुरू झालेली आहे. घराचे वातावरण तापलेले असतानाच आता या तापमानात भर घालण्यासाठी एक अडल्ट स्टार देखील घरात प्रवेश करणार असल्याचे समजते. सपना भाभी अशी ओळख असलेली ही अडल्ट स्टार फारच बोल्ड असून तीने अनेक बी ग्रेड सिनेमांमध्ये काम केले आहे.


सपना सुप्पु असे त्या अडल्ट स्टारचे नाव असून तिने 1998 साली मिथून चक्रवर्ती सोबत गुंडा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तिला सिनेमे मिळत नसल्याने तिने बी ग्रेड सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. तिने हिंदी, भोजपूरी, गुजरातीमध्ये गेल्या 20 वर्षात 200 सिनेमे केले आहेत. काही वर्षांपूर्वी लग्नानंतर ती गुजरातला स्थायिक झाली होती. मात्र काही वर्षातच तिचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर ती पुन्हा मुंबईला आली असून एकटीच आपल्या मुलाला वाढवत आहेत. तिने नुकतेच एका वेब सिरीजमधून पुनरागमन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post