राज्यात दिवाळीनंतरच शाळा सुरू होणारएएमसी मिरर वेब टीम
मुंबई : कोरोनाचे संकट अजूनही असल्यामुळे राज्यातील शाळा 15 ऑक्टोबरपासून सुरु न करता दिवाळीनंतर सुरु करण्याबाबत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. गेल्या काही महिन्यांपासून आँनलाईन शिक्षण सुरु झाले आहे. याबाबत आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाला दिले.

देशात अनलॉक 5 सुरू असून 15 ऑक्टोबरनंतर शाळा सुरु करण्याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. मात्र शाळा उघडण्याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित राज्य सरकारवर सोपवण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळा सुरु करण्याबाबत चर्चा झाली. कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याबाबत निर्णय घ्यावा अशी चर्चा झाली.

Post a Comment

Previous Post Next Post