मला वाटत ते रात्री कपडे घालूनच तयार असतात; शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला


एएमसी मिरर वेब टीम
पुणे :
महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती आहे, असं वक्तव्य करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार टोला लगावला आहे. पुण्यातील एका पत्रकार परिषदेमध्ये प्रश्नाला उत्तर देताना सरकार स्थिर असल्याचे सांगतानाच मला वाटत ते (भाजपाचे नेते) रात्री कपडे घालूनच तयार असतात, असा टोला लगावला आहे.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार लवकरच जाईल अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे. यासंदर्भात काय सांगाल असा प्रश्न शरद पवार यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना पवारांनी, “त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, आताचे सहा महिने गेले आहेत. आणखीन साडेचार वर्षे त्यांना वाट पहावी लागेल,” असं उत्तर देत राज्यातील सरकार स्थिर असल्याचे संकेत दिले. मात्र पुढे बोलताना त्यांनी, “मला वाटत ते (भाजपाचे नेते) रात्री कपडे घालूनच तयार असतात” असा खास शैलीतील टोलाही लगावला.

Post a Comment

Previous Post Next Post