तिसऱ्यांदा लग्न करणार ही अभिनेत्री? हळदीचे फोटो व्हायरल

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या वैयक्तिक आयुष्यावरून बरीच चर्चेत असते. अभिनय कारकिर्दीत यशस्वी ठरलेली ही अभिनेत्री खासगी आयुष्यात मात्र तितकीशी यशस्वी ठरली नाही. पहिल्या घटस्फोटानंतर तिने अभिनव कोहली या अभिनेत्यासोबत दुसरा संसार थाटला. मात्र, हा संसारही मोडण्याच्या वाटेवर आहे. या दरम्यान तिच्या तिसऱ्या विवाहाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.


सोशल मीडियावर श्वेता तिवारीच्या हळदीचे फोटो व्हायरल झाले आहेत. पिवळ्या रंगाचा पेहराव केलेल्या श्वेताना फुलांचे दागिने या घातलेले या फोटोत दिसत आहेत. त्यामुळे ती पुन्हा एकदा लग्न करणार का, या चर्चांना उधाण आलं आहे. पण, हे फोटो तिच्या खऱ्याखुऱ्या लग्नाचे नाहीत तर तिच्या मेरे डॅड की दुल्हन या मालिकेतील आहेत.

मालिकेत सध्या एक गोड वळण आलं असून मालिकेतील नायिकेला तिच्या वडिलांसाठी बायको सापडली आहे. त्यामुळे मालिकेत लग्नाचा मोसम सुरू झाला आहे. अंजली तत्रारी, वरुण बडोला या आपल्या सहकलाकारांसह श्वेता सध्या लग्नाच्या भागांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. त्यावेळी सेटवर काढलेले फोटो व्हायरल झाले आहेत.

काही काळापूर्वी श्वेताला कोरोना झाल्याची बातमी आली होती. त्यानंतर 14 दिवस ती क्वारंटाईन होती आणि 14 दिवसांनंतर चित्रीकरणासाठी हजर झाली होती. या दरम्यान तिने आपला वाढदिवसही मुलगी पलक तिवारीसोबत सेलिब्रेट केला होता.

Post a Comment

Previous Post Next Post