नवीन स्मार्टफोन खरेदी करताना करू नका ‘या’ चुका..

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

फोन हा सर्वाधिक वापरला जाणार डिव्हाइस आहे. नवीन स्मार्टफोन खरेदी करणे हा नेहमीच एक चांगला अनुभव असतो. अशा परिस्थितीत रिसर्च केल्याशिवाय नवीन फोन खरेदी करू नका. फोनच्या डिस्प्लेसोबतच कॅमेरा आणि बॅटरी चांगली असणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये परफॉर्मन्स आणि प्रोसेसर देखील वेगळे असतात. स्मार्टफोन मार्केट वेगाने बदलत आहे आणि रिसर्च किंवा प्लॅनिंग न करता फोन विकत घेणे तोट्याचे ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करताना कोणत्या चुका करू नये, याबद्दल थोडक्यात..

अधिक खर्च नका करू
दमदार फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही. जो अनुभव आपल्याला प्रीमियम डिव्हाइसमध्ये मिळतो, तसेच फीचर्स असलेल्या मिडरेंज सेगमेंटमध्येही तुम्ही स्मार्टफोन खरेदी करू शकता. किंमतीपेक्षा फोन आपल्या गरजेनुसार निवडणे नेहमीच चांगले.

लेटेस्ट मॉडेलच करा खरेदी
स्मार्टफोनचे मार्केट हे नेहेमी बदलत असल्यामुळे बाजारात सतत नवीन फोन लॉन्च होत असतात. अशातच तुम्ही स्मार्टफोन खरेदी करताना मार्केटमध्ये जो नवीन लेटेस्ट स्मार्टफोन आला असेल त्यावर रिसर्च करून खरेदी करा.

प्रीमियम ब्रँडच करा खरेदी
स्मार्टफोन खरेदी करताना अॅपल आणि सॅमसंग सारख्या प्रीमियम ब्रँडचे नाव समोर येते. मात्र, याच ब्रँडचे स्मार्टफोन विकत घेणे आवश्यक नाही. कारण अनेक अशा कंपन्या आहेत, ज्या कमी किंमतीत तेच फीचर्स असलेले स्मार्टफोन विक्री करतात. अशातच आपल्याला विश्वास असलेल्या ब्रँडचा फोन खरेदी करा.

(ही बातमी संकलित केलेल्या माहिती व तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी 'एएमसी मिरर'चा संबंध नाही.)

Post a Comment

Previous Post Next Post