Whatsapp मध्ये आलय 'हे' भन्नाट फिचरएएमसी मिरर वेब टीम 
ऑनलाईन न्यूज 
जगातील सर्वाधिक लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp चा वापर आपण सगळेच करतो. WhatsApp वर अनेक फिचर्स उपलब्ध आहेत. या फिचर्समध्ये आता आणखी एक फिचर जोडलं आहे. Whatsapp ने अॅडवान्स्ड सर्च हे फिचर नुकतेच रोलआउट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून बीटा व्हर्जनमध्ये या फिचरला टेस्ट करण्यात येत होतं. मात्र आता सर्वांसाठी हे फिचर उपलबद्ध करण्यात आलं आहे. या भन्नाट फिचरसाठी तुम्ही WhatsApp तात्काळ अपडेट करायला विसरु नका.

WhatsApp अपडेट केल्यानंतर सर्च आयकॉनवर टॅप केल्यानंतर तुम्हाला बदल दिसेल. व्हॉट्सअॅप युजर्संना सहज फोटो, व्हिडिओ, ऑडियो, जीफ फाईल आणि डॉक्यूमेंट्स यामुळे सहज सर्च करता येणार आहेत. म्हणजेच मेसेजेस शिवाय मीडिया फाईल्स सर्च करणे आता सोपे झाले आहे.

आधी युजर्संना मीडिया फाइल्स आणि टेक्स्ट साठी सिंगल सर्च ऑप्शन मिळत होता. आता फाईल शोधण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. नवीन ऑप्शनमधून मेसेज किंवा फाईल युजर्संना शोधायचे असल्यास त्याला सिलेक्ट करून सर्च करता येवू शकते.

Post a Comment

Previous Post Next Post