थंड पाण्याने चेहरा धुण्याचे 'हे' आहेत फायदे!

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

चेहरा हा प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. सर्वांसमोर आपण चांगले दिसावे असे सगळ्यांनाच वाटत असते. मग यासाठी कधी सौंदर्यप्रसाधनांचा वापर तर कधी पार्लरची वाट धरली जाते. पण हे उपाय तेवढ्यापुरते उपायकारक असतात. मात्र चेहरा दिर्घकाळासाठी चांगला व्हावा असे वाटत असेल्यास किंवा चेहऱ्यावर तेज वाढवण्यासाठी फक्त थंड पाण्याचा उपयोग करावा. जाणून घेऊयात सकाळी सकाळी थंड पाण्याने चेहरा धुतल्यानंतर होणारे फायदे..

सकाळी उठल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा. चेहरा धुताना साबण अथवा कोणताही फेसवॉश वापरु नका. फक्त थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. सकाळी उठल्यानंतर नियमीत थंड पाण्याने चेहरा धुतल्यानंतर थोड्याच दिवसांत फरक जाणवू लागेल. काही दिवसांत चेहऱ्यावर तेज दिसून येईल. सकाळी थंड पाण्याने चेहरा धुतल्यानंतर त्वचा घट्ट आणि टवटवीत राहते. शिवाय त्वचा तरुण राहते. दररोज थंड पाण्याने चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होतात. तसेच त्वचा तजेलदार होते आणि त्यामुळे रक्त प्रवाह तीव्र होतो आणि चेहऱ्यावर चकाकी येते.

सन बर्नचा त्रास होत असल्यास, दररोज सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवावा. शक्य असल्यास दिवसातून एक ते दोन वेळा आवर्जून करावं. असे केल्यास आपल्याला सूर्य किरणांच्या हानिकारक प्रभावापासून मुक्ती मिळेल आणि त्याच बरोबर आपल्या चेहऱ्यावर टवटवीत पणा येईल.

(ही माहिती जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी 'एएमसी मिरर'चा संबंध नाही. त्यामुळे आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post