कोबी खाण्याचे ‘हे’ गुणकारी फायदे माहित आहे का?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अनेक वेळा लहान मुले किंवा मोठी माणसं सुद्धा भाजी खाण्यास कंटाळा करतात. या नावडतीच्या भाज्यांमध्ये कोबी या भाजीचा हमखास समावेश होतो. अनेकांना कोबी भाजी अजिबात आवडत नाही. परंतु, ही भाजी नावडती असली तरीदेखील ती अत्यंत पौष्टिक आणि गुणकारी आहे. कोबीच्या सेवनाने अनेक लहान-मोठे आजार दूर होत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे कोबी खाण्याचे नेमके फायदे काय हे जाणून घेऊयात.

१. कोबीमध्ये अ जीवनसत्तव, व्हिटॅमिन सी यांचं पुरेपूर प्रमाण असतं. त्यामुळे कोबी हा शरीरासाठी आरोग्यकारी आहे. कोबीमुळे आतड्याचा कर्गरोग नियंत्रित राहू शकतो.

२. कोबीमध्ये अँटिऑक्सिडंट, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे प्रमाण अधिक असते. पत्ताकोबीचे रोज सेवन केल्यास सी जीवनसत्त्वाची ५० टक्के गरज पूर्ण केली जाऊ शकते.

३. कोबीच्या भाजीमुळे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

४. कोबीमुळे मज्जातंतू आणि मेंदूचे काम व्यवस्थित राहते.

५. कफ झाल्यास कोबीची भाजी नक्की खावी. कोबीमुळे कफ पातळ होतो.

६. कोबीमुळे पोट साफ राहते

७. पचनक्रिया सुरळीत राहते.

८. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

Post a Comment

Previous Post Next Post