वारंवार चेहरा धुवूनही त्वचा तेलकट राहतोय? मग हे उपाय करून बघा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

बदलत्या वातावरणामुळे अनेंकाची त्वचा तेलकट होते. त्वचेतील आद्रकतेचं प्रमाण कमी-जास्त होत असल्यामुळे आधिक काळजी घ्यावी लागते. आपल्या त्वचेचा पोत, रंग हे आपल्या हातात नसते. काहींची त्वचा खूप कोरडी असते तर काहींची खुप तेलकट असते. तेलकट त्वचा असणाऱ्यांचा चेहरा सतत तेलकट दिसतो. या लोकांच्या चेहऱ्याच्या त्वचेतून नैसर्गिकपणे तेल येत असल्याने चेहरा ठराविक काळाने काळवंडल्यासारखा दिसतो. सतत चेहरा धुतल्यानंतरही त्वचा तेलकट राहते. तेलकट त्वचेवर अनेक उपाय आहेत. पण नैसर्गिक आणि घरगुती उपाय तुमच्यासाठी फायद्याचं ठरु शकतात. याचा कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. शिवाय तुमच्या चेहऱ्यावरील ग्लोही वाढेल. पाहूयात कोणते आहेत उपाय…

१. कोरफड
तेलकट त्वाचेपासून सुटका करण्यासाठी कोरफड फायद्याची आहे. कोरफडीमध्ये एण्टी-इफ्लेमेट्री गुण आहेत. या गुणामुळे त्वाचला होणारं इन्फेक्शन थांबते. कोरपडीचं जेल दररोज चेहऱ्यार लावल्यानंतर तेलकटपणापासून सुटका होऊ शकते. तसेच त्वचेमध्ये असणाऱ्या पाण्याच्या प्रमाणाचा समतोल राखण्यासाठी कोरफड आणि हळद हे रामबाण उपाय ठरतात. ज्यासाठी १ टीस्पून हळद आणि कोरफडीचा गर आणि काकडीचा रस हे सर्व पदार्थ एकत्र करुन ही पेस्ट पंधरा ते वीस मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवावी आणि त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.

२. चंदन आणि हळद
चंदन आणि हळदीमुळे तेलकट त्वचा नाहिशी होते. तेलकट त्वचेपासून आराम मिळण्यासाठी हा आयुर्वेदिक उपाय असून याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. चंदन आणि हळद आणि हळदीची पेस्ट लावल्यानंतर तेलकट त्वचा नाहिशी होऊन तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल . चंदन आणि हळद समप्रमाण घ्यावं. त्यामध्ये लिंबाचा रस किंवा पाणी टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट १० मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर लावून ठेवा. दहा मिनिटांनंतर स्वच्छ पाण्यानं चेहरा धुवा.

3. मुल्‍तानी माती
आयुर्वेदातील घटक असलेली मुलतानी माती चेहरा उजळण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. तसेच चेहऱ्याचा कोरडेपणा दूर करण्यासाठीही या मातीचा लेप फायदेशीर ठरतो. तेलकट चेहऱ्यावर मुलतानी माती लावल्यात तुमचा चेहरा तजेलदार होईल. मुलतानी मातीत पाणी टाकून चांगले मिश्रण करा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा. तुमचा चेहरा आधिक तचेलदार होईल. शिवाय त्वचेवरील तेलकटपणाही दूर झालेला असेल.

४. दूध
त्वचेसाठी दूधाचा वापर कमीच केला जातो. पण तेलकट त्वचेपासून सुटका हवी असल्यास दुधाचा लेप चेहऱ्यावर लावा. लिंबू आणि दूध याचं व्यवस्थित मिश्रण करा. कॉटनच्या कपड्यानं चेहऱ्यावर लावा. दिवसातून दोन वेळा हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. तुमची त्वचा तचेलदार आणि सॉफ्ट होईल.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post