एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
हिंदू धर्मात अशोकाच्या झाडाला खूप महत्व दिले जाते. तुम्ही पहिले देखील असेल, प्रत्येक शुभकार्यात अशोकाच्या पानांचा, फांद्याचा वापर केला जातो. असे मानले जाते की, ज्या जागेवर अशोकाचे वृक्ष असतात, तिथे कुठल्याही प्रकारच दुःख किंवा अशांती राहत नाही.
अशोकाच्या झाडाचे औषधीय फायदे देखील आहेत :
1. अशोकाचे वृक्ष महिलांना शारीरिक आणि मानसिक ऊर्जा देण्यास यशस्वी असतो.
२. गर्भाशयाला सूज आली असता :
125 ग्रॅम दूध तेवढेच पाणी घेऊन त्यात 20 ग्रॅम अशोकाचे सालीचे चूर्ण घालावे हे मिश्रण उकळावे. पाणी आटून गेल्यावर उतरवावे. गाळून त्यात चवीपुरती साखर घालून बनवलेले अशोकारिष्ट दिवसातून तीन वेळा घ्यावे. रक्तप्रदर तसेच गर्भाशयाची सूज ओसरते.
३. महिलांच्या पाळी दरम्यान रक्तस्त्राव थांबवण्यासाठी देखील अशोकाचा उपयोग केला जातो.
४. मासिक पाळी लांबत असेल तर :
अशोकारिष्ट हे अशोकाचे बनवतात.125 ग्रॅम दूध तेवढेच पाणी घेऊन त्यात 20 ग्रॅम अशोकाचे सालीचे चूर्ण घालावे हे मिश्रण उकळावे. पाणी आटून गेल्यावर उतरवावे. गाळून त्यात चवीपुरती साखर घालून बनवलेले अशोकारिष्ट दिवसातून दोन वेळा घ्यावे. मासिक पाली वेळेवर येण्यास मदत होईल.
५. मूळव्याधासाठी :
अलीकडे मूळव्याध हि समस्या जास्त प्रमाणात उद्भवली जात आहे, त्यावर उपाय म्ह्णून देखील या झाडाचा उपयोग होत आहे.
६. हाडांसाठी :
अशोकाची सालची भुकटी हाडांसाठी खूप उपयुक्त ठरते. जरी एखादी व्यक्ती फ्रॅक्चर झाली असेल आणि तो जर दिवसातून दोन वेळा दुधासह 510 ग्रॅम अशोकाची साल घेत असेल तर तुटलेली हाडे देखील लवकर जोडण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते.
७. त्वचेसाठी :
अनेक प्रकारच्या त्वचेच्या समस्या शरीरातील रक्त अशुद्ध असल्या कारणाने होतात. यामुळे बर्याच वेळा त्वचेच्या ऍलर्जी, जलन आणि चिडचिडची सारख्या समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांना सामोरे जाण्यासाठी अशोकची फुले व पाने बारीक करून पेस्ट बनवलेल्या पेस्टसह बाधित भागावर लावल्याने आपल्या अनेक समस्येचे निदान होते आणि त्वचेचा रंग देखील सुधारित होण्यास मदत मिळते.
८. संधिवात मध्ये
अशोकाचे झाड आपल्याला संधिवात पासून आराम देण्यासाठी देखील कार्य करते. अशोकाचे झाड देखील वेदनशामक म्हणून सुरक्षितपणे वापरले जाते. सांधेदुखीसाठी अशोक वृक्षाच्या सालापासून बनविलेली पेस्ट वापरल्यास देखील मदत मिळते.
९. पोटदुखी
ओटीपोटात दुखणे ही एक सामान्य समस्या आहे. अश्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी अशोकाची साल पाण्यात उकळवा आणि या पेयाचा एक काढा बनवावा आणि दिवसातून दोनदा प्यावे, यामुळे पोट पोटदुखीपासून मुक्त होईल.
१०. रक्तरंजित पेचिश
रक्तरंजित पेचिश ही एक अतिशय गंभीर समस्या आहे. यापासून मुक्त होण्यासाठी आपण अशोक पुष्प तीन ते चार ग्रॅम बारीक चूर्ण करून पाण्याने घ्या. हे केल्याने रक्तरंजित पेचात खूप मदत होते.
(कोरा या संकेतस्थळावर आकाश कोल्हे यांनी ही माहिती दिली आहे.)
Post a Comment