सूर्य नमस्काराचे फायदे काय? रोज किती सूर्य नमस्कार घालावे?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

सूर्यनमस्कार हे खूप प्रभावी व्यायाम प्रकार आहे, ते रोज २५ तरी केले पाहिजे, जेवढे जास्त करता येतील तेवढे चांगलेच आहे. सूर्यनमस्कार हे सकाळी उगवत्या सूर्याबरोबर केले तर खूप चांगले..

सूर्यनमस्काराचे फायदे म्हणजे
१) आपली शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढते.
२) शरीर लवचिक बनते.
३) शरीर पिळदार बनते व खांदे व दंड मजबूत होतात.
४) शरीराच्या सर्व अवयवांचा योग्य व्यायाम होतो आणि ते चांगले काम करतात. जेणेकरून माणूस आजारी पडत नाही.

सूर्यनमस्कारात बारा आसन पवित्र्यांचा समावेश आहे. ते बारा पवित्रे असे आहेत :

1) प्रणामासन किंवा नमस्कारासन
2) हस्त उत्तासन
3) पादहस्तासन
4) अश्‍वसंचालनासन
5) पर्वतासन
6) अष्टांग नमस्कार
7) भुजंगासन
8) पर्वतासन
9) अश्‍वसंचालनासन
10) पादहस्तासन
11) हस्त उत्तासन
12) प्रणामासन

सुर्य नमस्कार घालताना, प्रथम सूर्याचे नाव घ्यायचे ‘ओम मित्राय नमः’ आणि मग वरील बारा पवित्रे घ्यायचे. एक नमस्कार पूर्ण झाल्यावर सूर्याचे दुसरे नाव घेऊन दुसरा सूर्यनमस्कार अशी बारा नावे घेऊन बारा नमस्कार घालायचे.

ही बारा नावे अशी आहेत :
1) ओम मित्राय नमः
2) ओम सूर्याय नमः
3) ओम खगाय नमः
4) ओम हिरण्यगर्भाय नमः
5) ओम आदित्याय नमः
6) ओम अकार्य नमः
7) ओम रवये नमः
8) ओम भानवे नमः
9) ओम पूष्णय नमः
10) ओम मरिचये नमः
11) ओम सवित्रे नमः
12) ओम भास्कराय नम:

(कोरा या संकेतस्थळावर अतुल कडलग यांनी ही माहिती दिली आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post