अंगाला सतत खाज सुटत असेल तर करा 'हे' घरगुती उपाय


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

बदलत्या हवामानामुळे त्वचेसंबंधीत अनेक आजार, समस्या डोकं वर काढतात. त्यातच दमट किंवा उष्ण वातावरणात सतत शरीरावर खाज येते. त्यातच जर अतिप्रमाणात खाजवल्यामुळे त्वचेला हानी पोहोचून संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळेच या त्रासापासून सुटका करुन घ्यायची असेल तर काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. चला तर मग पाहुयात सतत सुटणाऱ्या खाजेवर काही घरगुती उपाय..

शरीराला अतिप्रमाणात खाजवल्यास त्याजागी लाल डाग पडतात. कधीकधी खराब पाणी पिण्यामुळे किंवा अंघोश केल्यामुळेही शरिराला खाज सुटते. आज आपण पाहणार आहेत, खुजलीपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय …

१. बेकिंग सोडा आणि लिंबू
आंग सतत खाजवत असेल तर आंघोळीसाठी स्वच्छ पाण्याचा वापर करा. त्या पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि लिंबांचा रस मिसळा. या घरगुती उपायामुळे एक दोन आठवड्यात या समस्येपासून आराम मिळेल.

२. चंदन
आयुर्वेदात चंदानाचा अनेक प्रकारे वापर केला जातो. चंदन फक्त वासच नाही तर शरिरापासून खुजलीला दूर करते. तसेच तुमच्या अंगावरील दुर्गंदीही दूर करते. जिथे ज्यास्त प्रमाणात खाजवते त्या ठिकाणी चंदनाचा लेप लावा.

३. तुळस
तुळस ही बहुगुणी वनस्पती असून तुळशीचे अनेक फायदे आहेत. अगदी त्वचेचं सौंदर्य जपण्यापासून ते आजारावर तोडगा काढण्यापर्यंत तुळशीचा विविधांगी उपयोग करता येतो. त्यामुळे त्वचेवर खाज सुटल्यानंतर त्या भागावर तुळशीची काही पाने चोळा किंवा या पानांचा काढा काढून तो काढा खाज येत असलेल्या भागावर लावा.

४. खोबरेल तेल
अनेक वेळा त्वचा कोरडी पडल्यामुळे किंवा एखाद्या किटकाने दंश केल्यामुळे शरीरावर खास सुटते. एकाच जागी सतत खाजवल्यामुळे शरीराच्या त्या भागावर लाल रंगाचे चट्टे येतात. अशावेळी खाज येत असलेल्या भागावर खोबरेल तेल लावावं. तेलामुळे शरीरावरील खाज कमी होते.

५. कोरफड
शरीरावर खाज येत असल्याच त्या भागावर कोरफडीचा गर लावावा. हा गर लावल्यानंतर काही काळ तसाच ठेवावा. त्यानंतर गार पाण्याने तो भाग स्वच्छ पुसून घ्यावा. त्यामुळे खाज आलेल्या जागेवर कोणत्याही प्रकारचे लाल पट्टे येत नाहीत.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post