'वाय फाय' पेक्षा 'लाय-फाय'चा वेग खूप जास्त; काय आहे हे तंत्रज्ञान?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

लाय-फाय (Li-Fi) हे वाय-फाय Wi-Fi प्रमाणेच वायरलेस संप्रेषण आहे, परंतु लाय फायचा वेग वाय फाय पेक्षा खूप पटीने अधिक असतो तर तो कसा तर जाणून घेऊयात..

लाइट फिडेलिटी किंवा लाय - फाय एक व्हिजिबल लाईट कम्युनिकेशन्स (VLC) प्रणाली आहे. जी अत्यंत उच्च गतीवर प्रवास करणारे वायरलेस संप्रेषण चालवते. लाय - फाय सामान्य घरगुती एलईडी (प्रकाश उत्सर्जन डायोड ) बल्बचा वापर करते, ज्याच्या मदतीने डेटा ट्रान्सफर करणे शक्य होते. ज्याच्यामुळे प्रतिसेकंद २२४ गेगाबाईट्सने वेग वाढू शकतो.

२०११ मध्ये स्कॉटलंडमधील एडिनबर्ग युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ हेरॉल्ड हास यांनी लाय - फायचे संशोधन केले आहे. वायरपेक्षा एलईडी प्रकाशाच्या माध्यमातून नेटवर्कचा वेग हा जास्त असतो, हे त्यांना आढळून आले. लाय - फाय या तंत्रज्ञानाचा खरा शोध हा २०११ पूर्वीच लागला होता. पण त्यावेळी अपेक्षित वेग साध्य करता आला नाही.

लाय - फाय कसे काम करते ?
जसे सर्व इंटरनेट डिव्हाइस काम करतात, तसेच लाय - फाय देखील काम करतो. या लाय - फायमध्ये मुख्य रुपात तीन कम्पोनंट्सचा वापर केला जातो.

१. लॅम्प ड्रायव्हर
२. एलईडी लॅम्प
३. फोटो डिटेक्टर

या तिन्ही कम्पोनंट्स बरोबरच तुम्हाला अजून एक कनेक्शन पाहिजे, ज्याला आपण इंटरनेट म्हणतो. हे आपण पाहिलेच आहे की, हे लाईट्सच्या माध्यमातून डेटा ट्रान्समिशन करते. एलईडी बल्ब्बची काही वैशिष्ट्ये आहेत. एलईडी बल्बमध्ये प्रकाश उत्सर्जित करणारा डायोड आणि स्वयंप्रकाशी घटक असल्याकारणाने लाय - फायसाठी हे एकदम योग्य घटक आहेत. लाय - फायसाठी हाय - स्पीड डेटा रेटची आवश्यकता असते आणि एलईडी बल्बमध्ये डेटा लाईटच्या स्पीडने ट्रान्समिट होतात. या एलईडी बल्बमध्ये लाईट इंटेनसिटी खूप जलद गतीने बदलते. लाईट कधी चालू होते तर कधी बंद होते.

माणसांचे डोळे या लाईटच्या ऑन आणि ऑफला कधीही पाहू शकत नाहीत. पण फोटो डिक्टेटरला हे सर्व दिसते. या सर्व कारणांमुळे एलईडी बल्ब हे सर्वात चांगले आहेत. त्यामुळे आपल्याला अजून जलद गतीने हे सुविधा पुरवू शकते. लाय - फाय या तंत्रज्ञानाचा सध्या रशिया, फ्रान्स, इंग्लंड या देशांमध्ये केला जातो. नवीन भारताच्या महासत्तेच्या मार्गावर वाटचालीत मेक इन इंडियाची संकल्पना लक्षात घेता, भारतात हे तंत्रज्ञान वापरण्यावर भर देण्यात येत आहे.

एव्हाना या लाय - फायच्या माध्यमातून तुम्ही विचार देखील केला नसेल, एवढ्या वेगाने माहिती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवता येते आणि इंटरनेट सुविधा वापरता येते.

लाय - फाय सुविधा वाय - फायला मागे टाकून इंटरनेट जगतामध्ये एक मोठा बदल घडवून आणू शकते आणि लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे इंटरनेट स्पीडचा लाभ घेता येऊ शकतो. हे तंत्र लवकरच भारतात येईल, अशी आपण आशा करूयात..

(कोरा या संकेतस्थळावर चैतन्य आर्य यांनी ही माहिती दिली आहे. ) 

Post a Comment

Previous Post Next Post