राधाकृष्ण विखे पाटलांना शिवसेनेची ऑफर


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एक वक्तव्य करुन राजकीय भूकंप केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी शिवसेनेची ऑफर घेऊन आल्याचं त्यांनी साांगितले. विखे पाटील यांनी मात्र कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं वृत्त माध्यमांनी दिले आहे.

श्रीरामपूर पंचायत समिती नूतन इमारतीचे भूमिपूजन प्रसंगी सत्तार नगर जिल्ह्यात आले होते. त्यावेळी सत्तार यांनी हे वक्तव्य केलं आहे. विखे पाटील यांनी जरी राजकीय चर्चा नसल्याचे म्हटले असले तरी राजकीय चर्चांना मात्र उधाण आले आहे.

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीला लोणी गावात दाखल झाले होते. त्यांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत चर्चा झाली आणि दोघांनी घरी स्नेहभोजनही केलं. खरं तर विखे पाटील भाजपात जात असताना सोबत कोण जाणार ही चर्चा होत असताना अब्दुल सत्तार यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, अब्दुल सत्तार शिवसेनेत गेले आणि विखे पाटील भाजपात. आज शिवसेना सत्तेत आहे तर भाजप विरोधात आहे. विखे पाटील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत, त्यांनी शिवसेनेत यावं अशी ऑफर सत्तार यांनी विखे पाटील यांना दिली आहे. या अगोदरही विखे पाटील शिवसेनेत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याबद्दल मी बोलणार असून अंतिम निर्णय ते घेतील, असंही अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post