एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
केस हा स्त्रिया व पुरुष यांच्यासाठी सौंदर्याचा दागिना समजला जातो. काही जण स्टाइल म्हणून केसांना रंग लावतात तर काही जण पांढरे केस लपवण्यासाठी केसांना रंगवतात. बहुतेकजण केसांना रंग लावण्यासाठी केमिकलयुक्त हेयर प्रोडक्ट्सचा वापर करतात. केमिकलयुक्त प्रोडक्ट्समुळे केस निस्तेज होतात. अशापरिस्थितीत केसांची काळजी घेण्यासाठी जाणून घेऊयात घरच्या घरी नैसर्गिक आणि अगदी सोप्या पद्धतीनं केसांसाठी घरीच रंग कसे तयार करता येतील…
बीटचा रस : केसाला लाल रंगाची शेड द्यायची असेल तर बीटाच्या रसाचा वापर करू शकता. केसाला लाल रंगाची शेड देण्यासाठी एक कप बीटचा रस आणि तितकाच गाजराचा रस घ्या. त्या दोन्ही रसाचे मिश्रण करा. व्यवस्थित मिश्रण झालेला रस स्प्रे बॉटलमध्ये टाका. केसांच्या दोन्ही बाजूने व्यवस्थित फवारा. स्प्रे मारल्यानंतर केस तीन तासांपर्यंत टॉवेल किंवा इतर कपड्याने झाकून ठेवा. थंड पाण्याने केस स्वच्छ धूवून घ्या. तुमच्या केसांना लाल शेड आलेला असेल.
कॉफी : पांढरे केस काळेभोर करण्यासाठी कॉफी हा एक चांगला पर्याय आहे. कॉफिच्या वापरामुले केसांना सुंदर असा डार्क ब्राउन शेड येतो, सोबतच केस मजबूत होतात. सर्वात आधी तुम्ही स्ट्रॉन्ग ब्लॅक कॉफी तयार करुन थंड करण्यासाठी ठेवा. त्यानंतर तु्म्ही नियमीत वापरत असलेला वापरलेला कंडीशनरचे दोन थेंब टाका. याचं व्यवस्थित मिश्रण करा. या मिश्रणाला स्प्रे बॉटलमध्ये टाकून केसांवर लावा. तासभरानंतर केस पाण्याने केस धूवून घ्या. केस धुताना शॅम्पूचा वापर करू नका.
लिंबाचा रस : जवळपास सर्वांच्या स्वयंपाकघरात लिंबू असतो. पण प्रत्येकाला माहित असेलच असे नाही की लिंबाचा रस केसांना रंग देण्यासाठी उपयोगी असेल. लिंबामध्ये अॅसेडिक तत्व असतात जी केसांची चमक वाढवण्यासाठी फायद्याची ठरतात. एका भांड्यात लिंबाचा रस काढा. त्यामध्ये एक चमचा पाणी टाकून चांगले मिसळा. हे मिश्रण केसांना लावून तासभर ठेवा. त्यानंतर पाण्याने केस स्वच्छ करून घ्या.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
Post a Comment