शरीरावर चामखीळ उठण्याची कारणे व उपाय काय आहेत?

 

एएमसी मिरर वेब टीम

ऑनलाईन न्यूज 
आपल्या शरीरावर आपल्याला काही वेळा चामखीळ येतात. कधी कधी हे तीळ आणि चामखीळ आनुवंशिक असतात तर कधी शरीरातील बदलणाऱ्या हार्मोन्स मुळे पण आढळतात. हे तीळ किंवा चामखीळ आपल्या सौंदर्यात बाधक असतात. शरीरांवर जास्त प्रमाणात तीळ किंवा चामखीळ असल्यास त्वचा तज्ज्ञांकडून त्वरित परामर्श घ्यावे. हे एखाद्या आजाराचे संकेतही असू शकतात. काही वेळा चिकित्सक सर्जरी करण्याचे परामर्श देतात. पण ह्या चामखिळींना आपण काही घरगुती उपाय करून पण नाहीसे करू शकता.

शरीरातील एका विशिष्ट प्रकारच्या व्हायरसमुळे अंगावर चामखीळ येतात. त्वचेच्या पृष्ठभागावर वाढलेले लहान व खडबडीत अर्बुद म्हणजे चामखीळ. त्वचेच्या वेगवेगळ्या भागांवर प्रामुख्याने हात व बोटांची मागील बाजू, चेहरा, टाळू, पायाचा तळवा इत्यादींकर विविध आकारांच्या आणि आकारमानांच्या चामखिळी वाढू शकतात. तळपायावर वाढलेले चामखीळ पायाला कुरूप झाल्याप्रमाणे भासते, त्यामुळे चालताना वेदना होतात.

चामखीळ घालवण्याचे सोपे उपाय:

१. बटाट्याचा रस किंवा बटाटा बारीक करुन चामखिळीच्या जागी लावल्याने हळूहळू कमी होण्यास मदत होते.

२. लसूण हे फक्त खाण्यासाठी नव्हे तर सौंदर्यवर्धक देखील आहे. लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट करून दररोज रात्री तीळ किंवा चामखिळी वर लावून त्यावर स्वच्छ कापड टाकून ते झाकून ठेवावे. सकाळी उठल्यावर अंघोळ करून ते धुऊन घ्यावे. आठवड्यातून असे 3 -4 वेळा केल्याने चामखिळीचा नायनाट होण्यास मदत होते.

३. चामखिळीपासून सुटका मिळण्यासाठी तुम्ही अननस रस, फ्लॉवर रस, कांद्याचा रस अथवा मध वापरु शकता. कारण या सगळ्यांमध्ये चामखिळीला नाहीसा करण्यासाठीचं ऐजाईम्स अर्थात गुणधर्म असतात.

४. चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर असलेला बेकिंग सोडा चामखिळी नाहीशी करण्यासाठीही फायदेशीर आहे. बेकिंग सोडा एरंडाच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि चामखीळवर ती पेस्ट लावा.

५. केळं खाण्यासाठी, केसांची चमक वाढविण्याचा व्यतिरिक्त त्वचा चमकदार सतेज बनविण्यासाठी तसेच चामखिळीचा नायनाट करण्यासाठी वापरण्यात येतं. केळं बारीक करून ते चामखिळी वर लावावे. दररोज हे केल्यास चामखीळ नाहीसे होतात.

(कोरा या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post