कमी कॅल्शियमचे दुष्परिणाम काय आहेत?

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कमी कॅल्शियम म्हणजेच कॅल्शियम डेफिसीईनशी.. याचे इफेक्ट्स जाणून घेण्याअगोदर या बद्दलची माहिती पण जाणून घेऊ.

कॅल्शियम एक महत्त्वपूर्ण मिनरल आहे. आपले शरीर मजबूत हाडे आणि दात तयार करण्यासाठी याचा वापर करते. हृदय आणि इतर स्नायूच्या व्यवस्थित कार्यासाठी सुद्धा कॅल्शियम आवश्यक आहे. जेव्हा आपल्याला पुरेसे कॅल्शियम मिळत नाही, तेव्हा आपल्याला ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टियोपेनिया, कॅल्शियम कमतरता रोग अशा विकारांचा धोका वाढतो. ज्या मुलांना पुरेसे कॅल्शियम मिळत नाही, त्यांना वाढत्या वयात उंची न वाढन्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो.

बऱ्याच लोकांमध्ये वयानुसार कॅल्शियमच्या कमतरतेचे प्रमाण वाढते. ही कमतरता विविध कारणांमुळे असू शकते, जसे की,

 • दीर्घकाळापर्यंत कॅल्शियमचे सेवन कमी असणे, विशेषत: बालपणात.
 • अशी काही औषधे जी कॅल्शियम शोषण कमी करतात.
 • कॅल्शियम समृध्द असलेल्या आहार न घेतल्यास.
 • हार्मोनममध्ये बदल, विशेषत: हे स्त्रियांमध्ये होते.
 • काही अनुवांशिक घटकही यास कारणीभूत असतात.
 • व्हिटॅमिन डीची कमी पातळी असणे, ज्या मूळे शरीरात कॅल्शियम शोषणे कठिण होते.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने लहान आणि वयात येणाऱ्या मुला-मुलींसाठी सुचवलेले दररोजचे कॅल्शियम प्रमाण :
 • 0-6 महिने - 200 मिलीग्राम
 • 7-12 महिने - 260 मिलीग्राम
 • 1-3 वर्षे - 700 मिलीग्राम
 • 4-8 वर्षे - 1000 मिलीग्राम
 • 9-18 वर्षे - 1,300 मिलीग्राम

तसेच प्रौढ आणि वयस्क स्त्री पुरुषांसाठी सुचवलेले दररोजचे कॅल्शियम प्रमाण :
 • महिला, 19-30 वर्षे - 1000 मिलीग्राम
 • महिला, 31-50 वर्षे - 1000 मिलीग्राम
 • महिला, 51-70 वर्षे - 1,200 मिलीग्राम
 • महिला, 71 वर्षे आणि पुढे - 1,200 मिलीग्राम पर्यंत
 • पुरुष, 19-30 वर्षे - 1000 मिलीग्राम
 • पुरुष, 31-50 वर्षे - 1000 मिलीग्राम
 • पुरुष, 51-70 वर्षे - 1000 मिलीग्राम
 • पुरुष, 71 वर्षे आणि पुढे - 1,200 मिलीग्राम पर्यंत

स्त्रियांना पुरुषांपेक्षा अगोदरच म्हणजेच मध्यम वयापासून कॅल्शियमचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे, . एखादी स्त्री रजोनिवृत्तीकडे (मासिक पाळी बंद) येते तेव्हा आवश्यक कॅल्शियमची आवश्यकता पूर्ण करणे महत्वाचे असते.

रजोनिवृत्तीच्या दरम्यान, महिलांनी ऑस्टियोपोरोसिस आणि कॅल्शियम कमतरतेच्या आजाराचा धोका कमी करण्यासाठी कॅल्शियमचे सेवन वाढवावे लागतेच. रजोनिवृत्तीच्या दरम्यान इस्ट्रोजेन हॉर्मोन कमी होण्यामुळे स्त्रीयांची हाडे जलद कमकुवत होतात.

सुरुवातीच्या टप्प्यात कॅल्शियम कमतरतेमुळे कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. परंतु, स्थिती जसजशी वाढत जाते तसतसे ही लक्षणे विकसित होतात, जसे की,
 • गोंधळलेली अवस्था किंवा स्मृती गमावणे
 • स्नायू उबळ (muscle spasms)
 • हात, पाय आणि चेहरा सुन्न पडणे आणि मुंग्या येणे
 • औदासिन्य (depression)
 • भ्रम (hallucinations)
 • स्नायू पेटके (muscles cramps)
 • कमकुवत आणि ठिसूळ नखे
 • हाडांमध्ये लगेच फॅक्चर येणे


कॅल्शियमची कमतरता शरीराच्या सर्व भागांवर परिणाम करू शकते, परिणामी कमकुवत नखे, केसांची गती कमी होते आणि नाजूक आणि पातळ त्वचा हेही प्रॉब्लेम होऊ शकतात.

न्यूरोट्रांसमीटर रिलीज आणि स्नायूंच्या आकुंचन या दोन्हीमध्ये कॅल्शियमची महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यामुळे कॅल्शियमची कमतरतें मूळे निरोगी लोकांमध्ये फिट्स येऊ शकतात.


(कोरा या संकेतस्थळावर धीरज शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)
Post a Comment

Previous Post Next Post