फळे पिकवण्यासाठी कोणती रसायने वापरतात? त्याचे दुष्परिणाम काय?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

रसायनांचा वापर आता शेतीव्यतिरिक्त वेळेआधी कृत्रिम पद्धतीने फळे पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केला जातोय. लोक दररोज जी वेगवेगळी फळे खातात त्यांना हे माहिती नसते कि आजकाल बाजारामध्ये खूप प्रमाणामध्ये रसायनांचा वापर वेळेआधी कृत्रिम पद्धतीने फळे पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केला जातोय. आणि त्यामुळे कोणत्या प्रकारचे नुकसान होऊ शकते, त्याबद्दल थोडी माहिती घेऊयात..

खूप साऱ्या संशोधनांमधून असे उघड झाले आहे कि व्यापारी फळ शिजवण्यासाठी इथिलीन गॅस, कार्बाईड आणि इथेनॉल 39 या रसायनांचा वापर करीत आहेत. ज्यामुळे मानवी शरीरावर वाईट परिणाम होत आहे.

बाजारामध्ये जर कोणत्याही व्यापाऱ्याला कृत्रिम पद्धतीने फळे पिकवण्याचे तंत्र समजले कि थोड्याश्या फायद्यासाठी तो त्या तंत्राचा खूप आणि चुकीचा वापर करतो. त्यामुळे जर आपण अशी (कृत्रिम पद्धतीने पिकवलेली) फळे खाल्ल्याने नकळत आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. ज्यांना फळं शिजवण्याचे तंत्र कळाले तो त्याचा जास्त प्रमाणामध्ये वापर करून नकळत आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी खेळात आहे.

वेगवेगळ्या फळांमध्ये कार्बाईडच्या पुड्या ठेऊन कृत्रिम पद्धतीने फळे पिकवली जातात. परंतु अशी फळे आपल्या आरोग्यासाठी नक्कीच चांगली नसतात.

एथरेल 39 च्या सोल्यूशनचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये फळे पिकवली जातात.

मार्केटमध्ये खूप कमी असे व्यापारी आहेत जे इथिलीन गॅस वापरत आहेत. या तंत्राबद्दल स्थानिक तज्ञांशी बोलताना हे उघड झाले की कार्बाईड आणि इथेनॉल जास्त प्रमाणात घेतल्यास कर्करोग होण्याची शक्यता वाढते.

दोन्ही वेगवेगळ्या प्रकारची रसायने आहेत, फक्त त्यांची नावे भिन्न आहेत. दोघांचा पाण्याशी संपर्क येताच ते इथिलीन गॅस सोडतात, ज्यामुळे फळ वेळेपूर्वी पिकतात. जे मानवी शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे.

(कोरा या संकेतस्थळावर हरिश्चंद्र बोरगे यांनी ही माहिती दिली आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post