लहान मुलांना शरीरावर कांजिण्या का येतात?


एएमसी मिरर वेब टीम 
ऑनलाईन न्यूज 

कांजिण्या हा प्रामुख्याने लहान मुलांचा आजार आहे. हा आजार एकदा येऊन गेला, की परत होत नाही. पण काही व्यक्तींमध्ये हे विषाणू सुप्तावस्थेत राहतात आणि प्रौढावस्थेत 'नागीण' या रोगाद्वारे प्रकट होतात.

कांजिण्या हा आजार व्हेरिसेला झोस्टर (Varicella zoster virus (VZV) या विषाणुंमुळे होतो. कांजिण्या (चिकन पॉक्स) हा एक सामान्य पण वेगाने पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. बहुतेक वेळा याची लागण लहान मुलाना होते. पण प्रौढाना सुद्धा कांजिण्याची लागण झाल्याचे आढळून आले आहे. कांजिण्यामधे खाजणारे बारीक पुरळ त्वचेवर येतात. हे पुरळ आठवडभर राहतात. रुग्णास त्याबरोबर तापही येतो. एकदा कांजिण्या झाल्या म्हणजे रुग्णामध्ये कांजिण्याविरुद्ध आयुष्यभर टिकून राहील एवढी प्रतिकारशक्ती तयार होते. कांजिण्या झाल्याचे लक्षणावरून त्वरित घ्यानात येते. रुग्ण दिसायला विचित्र दिसला तरी ठरावीक कालावधी मध्ये तो बरा होतो. सहसा रुग्णास हॉस्पिटलमधे दाखल करावे लागत नाही. घरी उपचार केले तरी चालतात. आजारामध्ये गुंतागुंत झाल्यास वैद्यकीय मदतीची गरज भासते.

कांजिण्या हा वॅरिसेल्ला- झोस्टर या विषाणूमुळे ( हर्पिस विषाणू कुलातील ) होणारा आजार आहे. रुग्णाशी प्रत्यक्ष संपर्क येणे किंवा हवेमधून याचा प्रसार होतो. संसर्ग झाल्यानंतर विषाणूचा परिपाक काल 10-21 दिवसांचा आहे. त्यानंतर आजाराची लक्षणे दिसू लागतात. अंगावर पुरळ येण्याआधी दोन दिवस रुग्णापासून इतराना संसर्ग होऊ शकतो. अंगावर पुरळ येऊन त्यावर खपली धरेपर्यंत रुग्ण विषाणूचा वाहक असतो. पुरळ ये ऊन त्यावर खपल्या धरेपर्यंतचा काल सु. सात दिवसांचा असतो. प्रौढामध्येहा कालावधि अधिक असतो. कांजिण्या झालेल्या मुलाना सात दिवस शाळेपासून दूर ठेवण्याचा सल्ला यामुळे दिला जातो. अंगावरील पुरळांच्या सर्व खपल्या पडून जाईपर्यंत थांबण्याची फारशी गरज नसते.

वाढत्या मुलांच्या आयुष्यामधील कांजिण्या हा एक सामान्य आजार आहे. नागरी भागामधील नऊ ते दहा वयोगटातील 80-90% मुलाना कांजिण्या येऊन गेलेल्या असतात . सध्या कांजिण्यावरील लसीला नागरी भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामीण भागातील मुलाना कांजिण्याची प्रतिकारशक्ती तयार झालेली नसते. कारण कांजिण्याची तीव्रता कमी अधिक असली तरी एकदा कांजिण्या हो ऊन गेल्यानंतर आयुष्यभर पुन्हा कांजिण्या होत नाहीत. प्रौढामध्ये कांजिण्याची तीव्रता अधिक असते. कधीकधी प्रौढामधील कांजिण्यामुळे गुंतागुंतीचे आजार होऊ शकतात. कांजिण्यामुळे झालेल्या मृत्यूमधील निम्म्याहून अधिक व्यक्ती प्रौढ असतात.

(कोरा या संकेतस्थळावर सोनाली काळे यांनी ही माहिती दिली आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post