एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
अकोले तालुक्यात शिकारीच्या मागे लागलेल्या बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. शिकारही गेली व जीवही त्याला गमवावा लागला. अकोले तालुक्यातील आंबड भागातील मुक्ताईवाडी येथे ही घटना घडली.
याबाबतची माहिती अशी की, तालुक्यातील मुक्ताईवाडी (आंबड) येथील गवराम जाधव हे आपल्या विहिरीवर विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना एक बिबट्या पाण्यावर मृत अवस्थेत तरंगताना दिसला. त्यांनी सरपंच दत्तू जाधव यांना त्याबाबत माहिती दिली. त्यानंतर वनपाल व्ही.एन.पारधी यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृत बिबट्यास विहिरीबाहेर काढले. ही मादी बिबट्या असून दोन ते अडीच वर्षांची होती. शिकारीच्या मागे लागताना ती विहिरीत पडली असावा, असा अंदाज वनरक्षक ज्ञानेश्वर कोरडे यांनी व्यक्त केला. वन विभागाच्या सुगाव येथील नर्सरीत या मृत बिबट्याचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.भांगरे यांनी शवविच्छेदन केले. या नंतर शासकीय नियमानुसार या बिबट्याचा अंत्यविधी करण्यात आला.
Post a Comment