'या' आरोग्य प्लान्टमुळे दोन हजार रुग्णांची होणार सोय; सिव्हीलमध्ये झाले भूमिपूजन

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगरच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये २० केएल अत्याधुनिक क्षमतेच्या ऑक्सिजन प्लान्टमुळे तब्बल दोन हजार रुग्णांना सुविधा उपलब्ध होणार आहे. या प्लान्टच्या उभारणीचे भूमिपूजन सिव्हिल सर्जन डॉ. सुनील पोखर्णा यांच्या हस्ते नुकतेच झाले.

सुमारे ७० लाख रुपये खर्चून हा ऑक्सिजन प्लांट सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात उभारण्यात येणार आहे. हा प्लांट कार्यान्वित झाल्यानंतर २००० रुग्ण याचा फायदा घेऊ शकतील, अशी माहिती यावेळी सिव्हिल सर्जन डॉ. पोखर्णा यांनी दिली. यावेळी स्पार्क इंडस्ट्रीजचे सुपरवायझर जयप्रकाश त्रिपाठी, अधिसेविका एम. व्ही. गायकवाड, एम. उजागरे, अधिपरिचारिका सुरेखा आंधळे, निलेश जाधव, हेमंत सोनवणे, दत्तात्रय आंबेकर, हरीश छजलानी, महेश काळे, गंगलू मिक्वी आदी उपस्थित होते.

पालक मंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केलेल्या पाठपुरवठ्याने या ऑक्सिजन प्लांटसाठी निधी उपलब्ध झाला आहे. कोविडच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्यावेळी तसेच इतरही वेळेस निश्चितच रुग्णांसाठी हा प्लांट वरदान ठरेल. हा प्लांट कॅप्सुलच्या आकारासारखा दिसेल. अति उच्च क्षमतेचा हा ऑक्सिजन प्लांट डिसेम्बरच्या दुसऱ्या आठवड्यात कार्यन्वित होईल. हा प्लांट ३५ फूट उंच असणार असून सुरक्षेच्या कारणास्तव बंदिस्त असणार आहे. जिल्ह्यात एवढी मोठी ऑक्सिजन क्षमता असलेला हा पहिला प्लांट आहे. सिव्हीलमध्ये असलेल्या ऑक्सिजनच्या पाईप लाइनला डायरेक्ट ऑक्सिजन प्लांटमधून कनेक्शन जोडून रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होईल. त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी हा प्लांट उपयोगी ठरेल. ऑक्सिजनची गळती थांबेल, थेट पाईपलाईनमुळे ऑक्सिजन वाया जाणार नाही व यामुळे लाखो रुपयांची बचतदेखील होणार आहे, असे डॉ.पोखर्णा यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post