जिल्ह्यात ५८ हजारांवर रुग्ण, ८८८ मृत्यू; दिवसभरात २१५ बाधितांची भर

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

जिल्ह्यात आज १४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५५ हजार ६९४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.९६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २१५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४५८ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८१ आणि अँटीजेन चाचणीत १०४ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११, नगर ग्रामीण ०४, नेवासा ०४, राहुरी ०३, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०३ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २०, अकोले ०७, जामखेड ०१, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०६,नेवासा ०५, पारनेर ०२, राहाता १४, राहुरी ०८, संगमनेर १४, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १०४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा ०४, अकोले १०, जामखेड ४, कर्जत ०२, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ३९, नेवासा ०९, पारनेर ०१, पाथर्डी २०, शेवगाव ०६, श्रीगोंदा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४०, अकोले ०६, जामखेड ०६, कर्जत ०४, कोपरगाव ०१, नगर ग्रा.१९, नेवासा ०७, पारनेर ०६, पाथर्डी १७, राहाता ०९, राहुरी ०२, संगमनेर १८, शेवगाव १०, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या : ५५६९४
  • उपचार सुरू असलेले रूग्ण : १४५८
  • मृत्यू : ८८८
  • एकूण रूग्ण संख्या : ५८०४०
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

Post a Comment

Previous Post Next Post