एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकार सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढा देत असतात. सर्वसामान्यांना हक्क मिळवून देण्यासाठी कटिबध्द असलेले ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहेता व मकरंद घोडके यांना मिडीया लॉरिस्टर सन्मान प्रदान केला जाणार आहे. मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात लेखक व कोषागार अधिकारी महेश घोडके यांच्या हस्ते हा सन्मान मेहता व घोडके यांना प्रदान केला जाणार आहे.
मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्यावतीने इसळक-निंबळक येथे घरकुल वंचितांसाठी आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजनेच्या माध्यमातून उभे राहत असलेल्या प्रकल्पाचे धनादेश रविवार (29 नोव्हेंबर) रोजी स्वीकारले जाणार आहेत. यावेळी पत्रकार पुरस्कार वितरण होणार आहे. वंचितांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहेता व मकरंद घोडके यांना मिडीया लॉरिस्टर सन्मान प्रदान केले जाणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
घरकुल वंचितांना घर मिळण्यासाठी राबविण्यात आलेल्या आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा या योजनेच्या माध्यमातून घरकुल वंचितांना 80 हजार रुपयात 1 गुंठा जमीन मिळणार आहे. तर या योजनेस जागा देणार्या जागा मालक शेतकऱ्यांचा देखील खडकाळ पड जमिनीच्या मोबदल्यात चांगला फायदा होत आहे. या प्रकल्पात 212 घरे उभारण्यासाठी प्रत्येकी एक गुंठ्याचे प्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहे. जागा घेऊ इच्छिणार्या घरकुल वंचितांचे धनादेश रविवारपासून स्वीकारले जाणार असल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले आहे. रविवारी २९ रोजी दुपारी ३ वाजता न्यू आर्टस महाविद्यालयासमोरील हुतात्मा स्मारक येथे पत्रकार पुरस्कार वितरण व घरकुलांसाठी धनादेश स्वीकारण्याचा कार्यक्रम होणार असल्याचे अॅड. कारभारी गवळी यांनी सांगितले.
Post a Comment