एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त नगरला कौमी एकता सप्ताह साजरा होणार असून, यानिमित्त होणाऱ्या विविध स्पर्धांतून कलावंतांना कलाविष्काराची संधी मिळणार आहे. मखदुम एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटी व अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदच्यावतीने कौमी एकता सप्ताह 11 ते 16 नोव्हेंबरदरम्यान साजरा केला जाणार आहे.
या सप्ताहाचे उदघाटन 11 रोजी सकाळी 11 वा. रामचंद्र खुंट येथे अल-करम हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिराने करण्यात येणार आहे. सप्ताहामध्ये ऑनलाईन व्याख्यान, वृक्षारोपण, मोफत नेत्र शिबिर, साहित्यिक उपक्रम राबविले जाणार आहेत. मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान व सचिव डॉ.कमर सुरुर यांच्यासह अल-करम सोशल अॅण्ड एज्युकेशनल सोसायटी, मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी, फिनिक्स फाउंडेशन, अहमदनगर सोशल फाउंडेशन ट्रस्ट, मुस्कान वेलफेअर असोसिएशन, जीवन फाउंडेशन, रहेमत सुलतान फाउंडेशन आदी सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

Post a Comment