मंगळसूत्र चोरांचे धाडस वाढले; सावेडीत दिवसा घडली घटना


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडणारांचे धाडस दिवसेंदिवस वाढत आहे. सावेडीत दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत दुपारी पावणेतीनच्या सुमारास महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. एकीकडे कोरोना लॉकडाऊनच्या काळात रात्रीच्यावेळी घरफोड्या होण्याचे प्रकार वाढले असताना दुसरीकडे दिवसाही महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडण्याचे प्रकार होत आहे.

सावेडीत दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावेडीच्या आनंदनगर सोसायटी परिसरात राहणाऱ्या महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. 31 ऑक्टोबर रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास सावेडीतील कलानगर चौकाकडे जाणाऱ्या रोड शेजारी सावेडी जॉगिंग ट्रक जवळ घटना घडली. संबंधित महिला गिफ्ट खरेदी करून घरी परत जात असताना त्यांचे पाठीमागून कोणीतरी दोन अज्ञात व्यक्ती काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर आले व त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्यांचे मंगळसूत्र बळजबरीने ओढून चोरून नेल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post