दर्जेदार कामासाठी आक्रमक भूमिका घेतली तर ‘त्यांच्या’ पोटात गोळा का आला? कळकमर यांचा सवाल

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

जनतेच्या पैशाचा गैरवापर शिवसेना कदापी सहन करणार नाही. जोपर्यंत तपोवन रस्ता चांगल्या दर्जाचा होत नाही, तोपर्यंत शिवसेना या कामाकडे लक्ष देणार आहे. शिवसेनेने आक्रमक भूमिका घेऊन पाठपुरावा केला. त्यामुळे आज पुन्हा या रस्त्याचे काम करावे लागत असल्याचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी म्हटले आहे. रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे, जनतेच्या पैशांचा अपव्यय होऊ नये, यासाठी आक्रमक भूमिका घेतली तर ‘त्यांच्या’ पोटात गोळा का आला? असा सवाल करत त्यांनी ‘राष्ट्रवादी’ला टोला लगावला आहे.

तपोवन रस्त्याच्या कामाला पुन्हा सुरूवात झाल्यानंतर शिवसेना नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी कामाची पाहणी केली. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, विक्रम राठोड, संभाजी कदम, संजय शेंडगे, गिरीश जाधव, बाळासाहेब बोराटे, अमोल येवले, सचिन शिंदे, अक्षय कोतोरे, डॉ. चंद्रकांत बारस्कर, ऋषीकेश ढवण, अभिषेक भोसले, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

कळमकर म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तपोवन रस्त्याचे काम झाले होते. निकृष्ट कामामुळे रस्त्याची काही दिवसांतच चाळण झाली. शिवसेना उपनेते स्व. अनिल राठोड यांनी याची पाहणी करुन चौकशीची मागणी केली. अधिकार्‍यांनी तपासणी करुन काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा अहवाल शासनाला दिला. हा रस्ता पुन्हा चांगला करुन देण्याची मागणी शिवसेनेने केली होती. त्यानुसार या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post