एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
महापालिकेच्या वस्तूरुपी कर्ज वाटपात आमची कोणतीही फसवणूक झालेली नाही, काहींनी आमच्याकडे येऊन व आम्हाला चुकीची माहिती देऊन आमच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या आहेत, मनपा पतसंस्थेबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही, असे स्पष्टीकरण पतसंस्थेच्या वस्तुरुपी कर्जवाटपात ४५ लाखाचा अपहार झाल्याचे दावा करणाऱ्या काहींनी केला आहे. त्यामुळे महापालिका पतसंस्थेच्या सत्ता राजकारणातून पतसंस्थेविरोधात तक्रारी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग १ यांच्याकडे मनपा पतसंस्थेसंदर्भातील जुन्या तक्रारींची फेरचौकशी सध्या सुरू असून, यात सोने वस्तू कर्ज वाटपाचाही मुद्दा असल्याचे सांगण्यात आले.
मनपा पतसंस्थेने १ लाखाचे वस्तुरुपी कर्ज वाटप योजना राबवली होती. या एक लाखातून १० हजार रुपये पतसंस्था शेअर्सपोटी कापून घेऊन कर्जदारांना ९० हजार देण्यात आले होते व त्यातून त्यांनी सोने रुपी वस्तू घेण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या रकमेतून १३ हजाराची कपात करून ७७ हजाराचीच वस्तू दिल्याची व यातून पतसंस्थेने अपहार केल्याचा दावा काहींनी केला होता. तसे वृत्त प्रसिद्धी माध्यमांतून देण्यात आले होते. पण असा दावा करणाऱ्या निवेदनावर सह्या करणारांपैकी काहींनी, त्या निवेदनावर आमच्या चुकीची माहिती देऊन सह्या घेतल्याच्या तसेच कोऱ्या कागदावर सह्या घेऊन त्या तक्रारीच्या निवेदनाला जोडल्याचा दावा केला आहे व आमची पतसंस्थेविरोधात कोणतीही तक्रार नाही, असे स्पष्टीकरण मच्छिंद्र साबळे, साहेबराव बोरगे, संजय बोरगे, विजेंद्र घोरपडे, ज्ञानेश्वर मगर, देवीदास जाधव, संजय कांबळे, श्याम घोरपडे, विजय ठोकळ, विनय चव्हाण आदींनी दिले आहे. आम्ही नियमानुसार पतसंस्थेकडून कर्ज घेतले आहे तसेच पतसंस्थेने आमच्या अडचणी वेळोवेळी दूर केल्या आहेत. मुला-मुलींचे विवाह, शिक्षण खर्च कर्ज रुपाने दिल्याने आमची आर्थिक उन्नती पतसंस्थेमुळे झाली आहे, असेही यात आवर्जून स्पष्ट केले गेले आहे.

दरम्यान, नगर तालुका सहकार उपनिबंधकांच्या आदेशानुसार जिल्हा विशेष लेखा परीक्षकांनी मनपा कर्मचारी पतसंस्थेविषयीच्या विविध तक्रारींची फेर चौकशी सुरू केली आहे. संस्थेच्या माजी व्यवस्थापकांचा मनमानी कारभार, २ जून २०१९ रोजी झालेल्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची उपस्थिती व वस्तू कर्ज सोने खरेदी प्रकरणात मूळ कर्जाच्या रकमेपेक्षा कमी रक्कम मिळाल्याबाबतच्या तक्रारींची चौकशी या फेरचौकशीत होणार असल्याचे सांगितले जाते. या तक्रारींबाबत पुराव्यानिशी म्हणणे मांडण्याचे आवाहनही चौकशी अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
Post a Comment