डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे अ‍ॅप्रिकोट; जाणून घ्या फायदे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अनेक वेळा भाजीमंडईत गेल्यावर भाज्यांसोबतच काही फळांचीदेखील रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. साधारणपणे आंबा, फणस, पेरु, चिकू ही फळे साऱ्यांनाच ठाऊक आहेत आणि ती अनेक वेळा घराघरात पाहिलीदेखील जातात. मात्र काही फळे अशी असतात ज्यांच्याविषयी सामान्यपणे फारशी माहिती नसते. परंतु, ते आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असतात. यातच उदाहरण घ्यायचं झालं तर अ‍ॅप्रिकोट या फळाविषयी जाणून घेऊ. फारसं परिचयाचं नसलेल्या या फळामध्ये मोठ्या प्रमाणावर मॅग्नेशिअम,आर्यन, कॉपर,पोटॅशिअम,फॉस्फरस आणि अन्य पोषकद्रव्यांचे प्रमाण अधिक असतं.

अ‍ॅप्रिकोट खाण्याचे फायदे

१. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

२. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अ‍ॅप्रिकोटच्या रसाचं सेवन करावं.

३. अ‍ॅप्रिकोटमध्ये व्हिटॅमिन सी’चे प्रमाणही भरपूर असते. त्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि त्वचेला तजेला मिळतो.

४. अ‍ॅप्रिकोट खाल्ल्यामुळे केसगळती काही काळात कमी होते.

५. रक्ताची कमतरता भरुन निघते.

६. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रणात राहते.

७. हाडे बळकट होतात.

८. पचनसंस्था सुधारते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post