धूप व अगरबत्ती आपल्या शरीरास हानिकारक आहे का?

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अगरबत्ती ही बांबूपासून बनवलेली असते. पूर्वीच्या काळात अगरबत्ती किंवा धूपबत्ती या हवा शुद्धीकरणासाठी म्हणून वापरल्या जायच्या. पण नुकत्याच केलेल्या एका पाहणीनुसार असं लक्षात आलंय की, ऊदबत्तीचा धूर हा सिगारेटच्या धूरापेक्षा जास्त घातक असू शकतो.

धूपामधून निघालेला धूर हा जेनोटॅाक्सिक, मुटाजेनिक आणि सायटोटॅाक्सिक असतो. ज्यामुळे तुमच्या शरिरात पेशींच्या स्तरावर डीएनएमधे बदल घडू शकतात किंवा काही पेशी मारल्या जाऊ शकतात. अमेरिकन कॅंसर सोसायटीने केलेल्या पाहणीनुसार ऊदबत्तीच्या धुराने श्वसनाचा कॅंसर देखील होण्याची शक्यता उद्भवते.

आपल्या शरीरात श्वसनाची प्रक्रिया सुरळीत करणा-या नळीत या धुपातील धूराचे कण अडकल्यास अस्थमाचा रोग जडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

(कोरा या संकेतस्थळावर शौकत यांनी ही माहिती दिली आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post