महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यास हॉकी स्टिकने मारहाण?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर महानगरपालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने हॉकी स्टिकने या महिलेला मारहाण केली असून, जखमी झाल्यामुळे या महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिली.

महापालिका कामगार युनियनने या घटनेचा निषेध करत संबंधित भागातील सफाईचे कामकाज बंद करण्याचा पवित्रा घेतला आहे. महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना याबाबत कळविण्यात आले असून त्यांची भेट घेऊन संबंधित व्यक्तीवर अट्रोसिटी अंतर्गत कारवाईची मागणी केली जाणार असल्याचे युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सांगितले. दरम्यान या घटनेने मनपा कर्मचारी वर्तुळात खळबळ उडाली आहे

Post a Comment

Previous Post Next Post