श्रीराम मंदिरासाठी नीलमताई देणार चांदीची वीट; सोमवारी अयोध्येत देणार


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्याद्वारे चांदीची वीट दिली जाणार आहे.

अयोध्यातील श्रीराम मंदिराच्या पुनर्बांधणीतील पायाशी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या व शिवसेना कुटुंबाकडून एक किलो चांदीची वीट देण्याचा संकल्प सोडण्यात आला होता. त्याची पूर्तता येत्या १६ रोजी बलिप्रतिपदेच्या दिवशी होणार आहे. अयोध्यातील श्रीराम मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम वेगाने सुरू झाले आहे. यासाठी अगोदरच शिवसेना पक्षाच्यावतीने मदत करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या पुनर्बांधणी दरम्यान एक किलो चांदीची वीट शिवसेना आणि गोऱ्हे कुटुंबीय यांच्यावतीने देण्याची इच्छा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रगट केली होती. ही चांदीची वीट श्रीराम मंदिराचे ट्रस्टी यांच्याकडे १६नोव्हेंबरला बालप्रतिपदाचे शुभ दिवशी सुपूर्द करण्यात येणार आहे. १२ नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या विटेचे पूजन मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी करण्यात आले. यावेळी गोऱ्हे परिवारातील सदस्य उपस्थित होते.

या चांदीच्या विटेवर पुढील मजकूर आहे :

|| श्री गणेशाय नम: ||
हिंदूहृदय सम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नानुसार अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या प्रेरणेने व सौ. रश्मी, ना.आदित्य, तेजस ठाकरे यांच्या सहकार्याने प्रभू रामचंद्रांच्या चरणाशी एक खारीचा वाटा अर्पण करीत आहे....श्रद्धापूर्वक वंदन- ना.डॉ. नीलम गोऱ्हे ( उपसभापती, महाराष्ट्र राज्य) कै.दिवाकर व लतिकाताई गोऱ्हे परिवार, जेहलम जोशी. दि. १६ नोव्हेंबर, २०. बलीप्रतिपदा.'

Post a Comment

Previous Post Next Post