इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकलमध्ये मूलभूत फरक काय?


एएमसी मिरर वेब टीम 
ऑनलाईन न्यूज
बऱ्याच लोकांना इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल या शाखा सारख्याच वाटतात. काही लोकांना याच्याबद्दल थोडी फार माहिती असते. पण तेही यात गोंधळून जातात.

सर्वांत पहिला गैरसमज हा हे की इलेक्ट्रॉनिक्स हे कमी व्होल्टेजवर काम करते आणि इलेक्ट्रिकल जास्त वोल्ट्सवर, पण हे खरं नाही.

काही लोकांना वाटते की इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे dc supply वर काम करणारे आणि इलेक्ट्रिकल ac वर काम करणारे, पण तेही चूक आहे.

कारण, इलेक्ट्रॉनिक्समध्ये एक विषय/शाखा अशी आहे की, ती high voltage वर काम करते. तीच नाव आहे इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. अगदी वीज निर्मिती केंद्रात सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स अभियंते नियंत्रणाचे काम करतात, ते इलेक्ट्रॉनिक्स वापरूनच. दुसरा गैरसमज म्हणजे ac dc वाला तो तर अगदी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरला सुद्धा होऊ शकतो. का? तर ते पुढे सांगतो. पण इलेक्ट्रॉनिक्स devices ac वर सुद्धा काम करतात आणि ते म्हणजे आपले दूरसंचार साधने. FM, TV, कृत्रिम उपग्रह, भ्रमणध्वनी हे सगळे ac सिग्नल म्हणजेच ac व्होल्टेज वर काम करतात कारण यात उच्च वारंवारता (frequency) असते. काही इलेक्ट्रिकल उपकरणे हे dc वर काम करतात, जसे dc मोटर. काही ठिकाणी dc व्होल्टेज/करंट दूरवर पाठवले जाते. लोकल ट्रेन्स ह्या सुद्धा dc वर चालतात. त्यामुळे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स दोन्ही ac व dc दोन्ही प्रकारचे करंट वापरतात.

मग इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्समध्ये फरक येतो तो कोठे? तर त्यांच्या devices मध्ये. इलेक्ट्रॉनिक साधने ही अर्धवाहकाची (semiconductors) बनली असतात. उदा. सिलिकॉन व जरम्यानिअम. यांच्यापासून IC, ट्रांसिस्टर, diode वगैरे बनविले जातात. आजच्या काळात जवळपास प्रत्येक इलेक्ट्रॉनिक साधनात तुम्हाला IC दिसेल.

इलेक्ट्रॉनिक्समध्ये इलेक्ट्रोन्सच्या वाहनाला नियंत्रित केले जाते व कार्ये केली जातात. इलेक्ट्रिकलमध्ये मुख्यतः विजेची निर्मिती, पुरवठा व वहन या गोष्टींवर भर दिला जातो. याशिवाय इलेक्ट्रिकलमध्ये साधने हे इलेक्ट्रिक करंटच्या धातुमधील वहनावर भर देतो. जसे मोटर, ट्रान्सफॉर्मर्स, कॉइल्स आदी.

मग वरील गोंधळ कशासाठी तर सेमी-कंडक्टर आपल्या कार्यासाठी dc व्होल्टेज वापरतात त्यामुळे. पण इलेक्ट्रॉनिक्सने यावर सुद्धा उपाय काढला आणि ac ते dc फक्त इलेक्ट्रॉनिक वापरून सुद्धा बनवता येते.

उदा. LED बल्ब, SMPS, मोबाईल चार्जर.

(कोरा या संकेतस्थळावर मनोज हरसुले यांनी ही माहिती दिली आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post