सर्दी, खोकला, त्वचेशी संबंधित समस्यांवर रामबाण उपाय.. जाणून घ्या मोहरीच्या तेलाचे फायदे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

स्वयंपाक घरात मोहरीला विशेष स्थान आहे. कोणतीही भाजी किंवा पदार्थ करताना वापरण्यात येणाऱ्या मोहरीचा वापर फक्त चव वाढविण्यासाठीच होतो असं नाही. तर, तिच्यात काही शरीरासाठी आवश्यक गुणधर्मदेखील आहेत. सर्दी खोकला यासारख्या आजारावर आरोग्यदायी आहेच शिवाय केसांच्यावाढीसाठी मोहरीच्या तेलाचा वापर केला जाते. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात मोहरीचे काही फायदे..

त्वचा उजळण्यासाठी
मोहरीच्या बियांचा वापर नैसर्गिक स्क्रब म्हणूनही करता येतो. मोहरीच्या बियांमध्ये गुलाब पाण्याचे ३-४ थेंब टाकून त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करावा. त्यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते. खोबरेल तेलात मोहरीचे तेल मिसळून चेहऱ्यावर लावा. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारेल आणि त्वचा उजळेल.

केसांच्या आरोग्यासाठी
केस रुक्ष होणे, खाज, कोंडा यांसारख्या केसांच्या समस्येवर मोहरीचे तेल गुणकारी ठरते. आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल कोमट करुन त्याने केसांना मसाज करा आणि त्यानंतर अर्ध्या तासाने केस शॅम्पूने धुवा. केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होईल व केस चमकदार होतील.

कोणत्याही सर्दीला इतर उपचार दाद देत नसतील तर मोहरीची चिमूटभर पूड मधाबरोबर खावी.

छातीत खूप कप झाल्यास मोहरी व मीठ यांचा काढा प्यावा. काढा प्यायल्यावर उलटी होते आणि छातीत जमा झालेला कफ बाहेर पडण्यास मदत होते. परंतु, हा प्रयोग केवळ तरुण व्यक्तींनीच करावा. लहान मुले किंवा वृद्ध व्यक्ती यांनी हा प्रयोग करु नये.

पोटफुगी, अपचन, अजीर्ण याकरिता मोहरी चूर्ण आल्याच्या रसाबरोबर घ्यावे. मोहरी खूप उष्ण आहे, याचे भान नेहमी ठेवावे.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post