पोटाच्या तक्रारींवर 'अळीव' रामबाण उपाय; जाणून घ्या फायदे

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अळीव हा प्रकार काहींना माहित असेल किंवा काहींना माहित नसेल. तर ज्याप्रमाणे रवा किंवा बेसन यांचे लाडू करतात त्याचप्रमाणे अळीवाचे लाडू केले जातात. अनेकदा स्त्रियांना बाळंतपणानंतर शरीरातील झीज भरुन काढण्यासाठी अळीवाचे लाडू दिले जातात. विशेष म्हणजे अळीव हे फक्त बाळंत स्त्रियांसाठीच फायदेशीर नसून प्रत्येक व्यक्तीसाठी फायदेशीर आहेत. त्यामुळेच अळीव खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. मासिक पाळीदरम्यान कंबर दुखत असेल तर अळीवाची खीर प्यावी.

२. बद्धकोष्ठता, अपचन या समस्यांमध्ये अळीव फायदेशीर ठरतात.

३. वजन नियंत्रणात राहतं.

४. हिमोग्लोबिन वाढतं.

५. मासिक पाळीची तक्रार दूर होते.

६. त्वेचासाठी फायदेशीर

७. केसांची वाढ होते.

८. स्मरणशक्ती वाढते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post