एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
अबाल-वृद्धांना आवडणारा पदार्थ म्हणजे चॉकलेट. सध्या बाजारात विविध प्रकारचे, आकाराचे चॉकलेट मिळतात. त्यात सुद्धा डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट असे एक ना अनेक प्रकार आहेत. चॉकलेटच्या याच नव्या रंगरुपामुळे लहान-थोर सारेच त्याच्या मोहात पडतात. अनेक जण इच्छा किंवा आवड म्हणून चॉकलेट खातात. परंतु, चॉकलेट खाण्याचे काही गुणकारी फायदे आहेत. हे फार कमी जणांना माहित आहे. त्यामुळेच चॉकलेट खाण्याचे नेमके फायदे कोणते हे जाणून घेऊयात.
१. चॉकलेटमध्ये कोको बीन हा मुख्य घटक असून यामध्ये असलेल्या फ्लावनोल्समध्ये शरीरातील पेशींचे संरक्षण करण्य़ाची क्षमता असते. फ्लावनोल्स या घटकामुळे वयस्कर व्यक्तींची आकलन क्षमता, स्मरणशक्ती यांच्या कार्यामध्ये सुधारणा घडविण्यासाठी मदत होते.
२. अचानक रक्तदाब कमी झाल्यावर चॉकलेट खाल्ले तर तत्काळ रक्तदाब नियंत्रणात येऊ शकतो.
३. आजकाल अनेकांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आढळून येते. शरीरातील एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि त्यामुळे होणा-या आजारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी चॉकलेट उपयुक्त ठरते.
४. चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंटस मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे चेह-यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी चॉकलेट बाथ, फेशियल, पॅक आणि व्हॅक्स यासारखे पर्याय उपलब्ध झाले आहेत.
५. उतारवयात चेह-यावर सुरकुत्या पडणे, त्वचा निस्तेज होणे यासारखे शारीरिक बदल होत असतात. मात्र चेह-यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी चॉकलेटचे सेवन जरुर करावे.
६. नैराश्यग्रस्त असताना चॉकलेट खाल्ल्याने मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे या काळामध्ये चॉकलेट खाणे कधीही उत्तम.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment